आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध वाळूचे ३७ साठे पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अवैधरित्या गौणखनिजाची साठवणूक करणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासनाने धडाका लावला असून आतापर्यंत हजार ब्रासहुन अधिक वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे. यात वाळू साठे करू देणाऱ्या जमीन मालकांवरही कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने गुरूवारी दिला.
राज्यातील वाळूचे अवैधपणे उत्खनन करून तस्करी करणाऱ्यां विरोधात ‘एमपीडीए’ कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र एमपीडीए ची अंमलबजावणी होण्यापुर्वीच जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी वाळूचा साठा करणाऱ्याविरोधात हे छापे घालण्यास सुरूवात केली आहे. गौणखनिजाचे अवैध उत्खनन, साठेबाजी आणि काळाबाजारी करणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी जिल्ह्यात ही कारवाई करण्यात येत असल्याचे गित्ते यांनी दिव्य मराठीला सांगितले.

जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांची पथके तयार करुन वाळू आणि गौण खनिजांच्या अवैध सामुग्रीचा शोध घेण्यात आला. मंगळवारी (दि.२३ ) एकाच दिवशी ३७ अवैध साठे पकडण्यात आले. त्यामध्ये २३८० ब्रास वाळू आणि २३ ब्रास मुरुम असे एकूण २४०३ ब्रास अवैध गौण खनिज जप्त करण्यात आले.
यानंतर एमपीडीए कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल होणार असल्याने वाळू तस्करांचा सतत सामना कराव्या लागणाऱ्या महसूल प्रशासनाला या कायद्याचा मोठा आधार मिळणार आहे. अवैधरित्या साठे केल्या जात असल्यामुळे वाळूघाट लिलावाला प्रतिसाद मिळत नाही. या अवैध साठ्यामुळे अनावश्यक वाळूचा उपसा होतो. आणि नविन कंत्राटदार वाळूघाट भाडेपट्टीवर घेत नाही. कारण त्या कंत्राटदाराला उत्पन्न होत नाही, असे गित्ते यांनी सांगितले.

अवैधवाळू साठवणुकीस प्रतिबंध :
जिल्ह्यातवाळू आणि इतर गौण खनिजांची अवैधपणे साठवणुक आणि वाहतुक होत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी अशा अवैध वाळू साठवणुकीस प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने धडक मोहीम राबवुन महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १९६६ चा कलम ४८ मधील पोट कलम ८(१) ८(२) नुसार कारवाई करण्याचे निर्देश दिलेत.
नव्या नियमानुसार पाचपट दंडाची आकारणी
महाराष्ट्रशासन अध्यादेश क्रमांक-१२ नुसार(दि.१२ जून २०१५)-महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १९६६ च्या कलम ४८ मध्ये सुधारणा करण्यात येऊन यापुर्वी तिप्पटीने आकारण्यात येणारा दंड आता पाचपट करण्यात आलेला आहे. तसेच कलम ४८ मधील पोट कलम ८(१) नुसार ज्यावरील हक्क राज्य शासनाकडे निहित आहे आणि राज्य शासनाने ज्यांचे अभिहस्तांकन केलेले नाही अशा कोणत्याही खाणीतुन किंवा पोट कलम (७) मध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही जागेतुन काढलेले, गोळा केलेले, हलविलेले, दुसऱ्या जागी नेलेले, उचलुन घेतलेले किंवा विल्हेवाट लावलेले कोणतेही खनिज ताब्यात घेता येईल आणि ते सरकार जमा करण्यात येईल. तसेच अशा अवैध कामाच्या वाहतुकीसाठी वापरलेले कोणतेही यंत्र सामुग्री, साधन सामुग्री ताब्यात घेऊन सरकार जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे.
जप्त वाळूसाठ्याचा करणार लिलाव
अवैधवाळू जप्ती प्रकरणात जिल्ह्यात १२ तालुक्यातील १६ वाहने जप्त करण्यात आली आहे. त्यावर १० लाख रुपये दंड करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेली २४०३ ब्रास वाळू लिलाव करण्यात येईल. किरणगित्ते, जिल्हाधिकारी.
१६ वाहने जप्त
अमरावतीतालुक्यातील वाहने, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील वाहने, चांदूर बाजार तालुक्यातील वाहने, धारणी तालुक्यातील वाहने, मोर्शी तालुक्यातील वाहने, धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाहने असे अवैध वाळू साठ्याची वाहतुक करणारी एकूण १६ वाहने जप्त करण्यात आली आहे.
तालुका जप्त वाळू ( ब्रास)
अमरावती५४०
तिवसा ५५२
भातकुली ७०
अंजनगाव सुर्जी २६८
दर्यापूर
अचलपूर ११४
चांंदूर बाजार ११८
धारणी ७४
मोर्शी ३०२
वरुड ९४
चांदूर रेल्वे ३८
धामणगाव रेल्वे २०५
एकूण२३८०
अवैध वाळूची अशाप्रकारे साठवणूक केली जाते.
अवैध वाळू साठ्याच्या पकडलेल्या ट्रकवर कारवाई करताना अधिकारी.
बातम्या आणखी आहेत...