आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात ८० टक्के पिकांचेमोठे नुकसान,केंद्रीय पथकाकडून परिस्थितीची पाहणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - निसर्गाच्यालहरीपणामुळे जिल्‍ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दिल्ली येथून आलेल्या केंद्रीय पथकाने मंगळवारी (दि. १६) जिल्‍ह्यातील विविध भागांमधील िपकांची पाहणी करत सात शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. खरीप हंगामात पिकांचे सरासरी ७५ ते ८० टक्के नुकसान झाल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून देण्यात आली. सोयाबीन, कापूस, तूर संत्रा या नगदी पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून दिले. केंद्रीय पथक आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणत्या शिफारशी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोमवारी रात्री अमरावती मुक्कामी राहिलेल्या पथकाने मंगळवारी (दि. १६) सकाळी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जळू, टिमटाळा, सावनेर शेलू नटवा आदी गावांतील पिकांच्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. जळू येथील अमोल वठि्ठल ठाकरे, दिगंबर साखरकर, टिमटाळा येथील सरस्वती पटेल, विजय राजेंद्र टेम्बे, सावनेर येथील आनंद सरदार, उमराव टाले सेलू नटवा येथील विजय वनिायक रंगारी यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानाची पाहणी करीत माहिती घेतली. सोयाबीन, तूर, कापूस संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याचे या वेळी निदर्शनास आले. अनेक ठिकाणी पथकाला सोयाबीनचे पीक आढळून आले नाही, काही ठिकाणी एकरी ५० ते ७० किलो सोयाबीन आढळून आले.
अनेक ठिकाणी तुरीला शेंगाच लागल्या नव्हत्या. काही ठिकाणी शेंगा होत्या; पण त्या भरलेल्या नव्हत्या. कमी पर्जन्यमान तसेच हवामानातील बदलामुळे खरीप पिकांचे आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उद््भवलेल्या टंचाईसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आर. पी. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय केंद्रीय पथक दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले आहे.