आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पोलिसाचे एक लाखाचे मंगळसूत्र लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जीआरपी (रेल्वे पोलिस) दलात कार्यरत महिला पोलिस नाईक सहा दिवसांपूर्वी बडनेराहून ऑटोरिक्षाने अमरावतीला आल्या. रुक्मिणीनगरला उतरल्यानंतर पर्स चोरीस झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पर्समध्ये 35 ग्रॅम वजनाचे एक लाखांचे मंगळसूत्र होते. या प्रकरणी त्यांनी शुक्रवारी (दि. 2) रात्री राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
अलका सुधाकर राऊत या बडनेरा येथील रेल्वे पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. सोमवारी (दि. 28) त्या बडनेरावरून ऑटोरिक्षाने अमरावतीला आल्या होत्या. या प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची पर्स लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या या पर्समध्ये त्यांनी 35 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ठेवले होते तसेच तीन हजारांची रोकड होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शुक्रवारी तक्रार दिली आहे.