आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खापर्डे बगीचा परिसरातून महिलेचे मंगळसूत्र लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-पायीजाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी लंपास केल्याची घटना खापर्डे बगिचा परिसरात घडली. आरती अतुल टावरी या पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र पळवले. या घटनेमुळे घाबरलेल्या टावरी यांनी आरडाओरड केली तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या प्रकरणी टावरी यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.