आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chatrapati Sambhjai Raje Speaks On Maratha Reservation

..तर जनतेसाठी माझा लढा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- मी केवळ मराठय़ांना आरक्षण मिळवून देण्यासाठी महालाबाहेर पडलो नाही, तर जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी दबावगट निर्माण व्हावा, यासाठी माझा लढा आहे, अशा स्पष्ट शब्दांत कोल्हापूर संस्थानचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी अमरावतीकर जनतेशी संवाद साधला.

महाराष्ट्रातील जनतेच्या भावना जाणून घेण्याच्या दृष्टीने युवराज संभाजीराजे यांनी रयत जागर अभियान (शिव-शाहू यात्रा) सुरू केले आहे. शुक्रवारी (दि. 29) सायंकाळी हे अभियान येथे पोहोचले. त्यानंतर शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात सभा घेण्यात आली. या वेळी उपस्थितांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. उद्घाटक शेखर भोयर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड आदी मान्यवर या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले युवराज संभाजीराजे म्हणाले, छत्रपतींच्या काळातील शिवराज्य केवळ मराठा समाजाच्या आधारे प्राप्त झाले नव्हते. अठरापगड जातींना सोबत घेऊन त्यांनी शिवशाही स्थापन केली होती. त्यामुळे त्या सर्वांच्या काय समस्या आहेत, हे जाणून घेणे माझे नैतिक कर्तव्य आहे. त्यासाठीच मी घराबाहेर पडलो. त्या सोडवण्यासाठी दबावगट निर्माण करावा लागेल, यावर त्यांनी भर दिला.

शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झालेले रयत जागर अभियान शुक्रवारपासून जिल्ह्यात पोहोचले आहे. दुपारी या अभियानांतर्गत दर्यापुरात सभा झाली. त्यानंतर सायंकाळी अमरावतीत सभा घेण्यात आली. या वेळी गजानन कोरे, मधुकर मेहकरे, बबनराव कोल्हे, अरविंद गावंडे, हरिभाऊ लुंगे, डॉ. वसंत लवणकर, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष कांचन उल्हे, भास्करराव टोम्पे, शेख सुलतान, संदीप बगाडे, चंद्रकांत मोहिते, अभय गावंडे, अजित पाटील आदी उपस्थित होते.

शिवराज्याभिषेक राष्ट्रीय सोहळा म्हणून साजरा व्हावा
युवराजांच्या मते, शिवराज्याभिषेकाचा सोहळा राष्ट्रीय सोहळा म्हणून साजरा झाला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत नाहीत, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. त्याच वेळी राजे छत्रपतींवर प्रेम करणारी मराठी जनता दरवर्षी रायगडावर हा सोहळा मोठय़ा उत्साहात साजरा करते, ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.