आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister Devendra Fadnavis News In Marathi

कापूस विक्रीचा नफा शेतक-यांना द्या, राज्य सरकारने केली केंद्राकडे मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘शेतक-यांकडून खरेदी केलेल्या कापसाच्या विक्रीतून मिळणारा नफा शेतकऱ्यांनाच वितरीत करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे,’ अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ११ एप्रिलला अमरावती येथे दिली. कृषी विकास प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शन कार्यशाळेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
सीसीआयने राज्यातील शेतकऱ्यांचा एक कोटी क्विंटल कापूस खरेदी केला आहे. या कापसाच्या विक्रीतून सीसीआयला मोठ्या प्रमाणात नफा होणार आहे. बाजारात कापसाला ३,२०० रुपये क्विंटलचे दर असताना सीसीआयने ४,०५० च्या उर्वरितपान. १२
दरानेकापसाची खरेदी केली. त्यामुळे कापसाच्या खरेदीतून होणारा तोटा भरून काढण्याकरिता राज्य सरकारने सीसीआयला ८०० कोटी रुपये दिले. तेव्हा आता कापसाच्या विक्रीतून होणाऱ्या नफ्यात आमच्या शेतकऱ्यांचाही वाटा आहे, अशी मागणी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार यांच्याकडे केली आहे. या प्रस्तावावर निर्णय घेऊ, असे आश्वासनही केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्र्यांनी दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

या वेळी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकरराव रावते, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, मधुकरराव किंमतकर, सी. डी. मायी, गिरीश गांधी, सोमेश्वर पुसतकर यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राज्यकर्त्यांना रात्रीची झोप येणे शक्य नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आणि राज्यकर्ते झोपत असतील तर त्यांना राज्य करण्याचा अधिकार नाही, या मताशी सहमत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना शेतकऱ्यांनी कर्जमाफीसंदर्भात घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांनी तोडग्याचे आश्वासन दिले.

कर्जमुक्तीच्या मागणीचा विचार करू
शेतकरीसंघटनेचे संजय कोल्हे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमादरम्यानच कर्जमुक्ती द्या अशी घोषणाबाजी केली. या वेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. यावर मुख्यमंत्र्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना कर्जमुक्ती करण्याची मागणीही पूर्ण करू, असे आश्वासन दिले. त्यांनतर आंदोलक शांत झाले.