आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chief Minister Will Be Honour National Service Scheme Coordinator

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रासेयो समन्वयकांचा झाला गौरव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राष्ट्रीयसेवा योजना विद्यार्थी कल्याण विभागाद्वारे आंतरविद्यापीठ रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान यशस्वीपणे प्रभावीपणे राबवल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०१५ पुरस्कार देऊन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला सन्मानित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रासेयो समन्वयक डॉ. अरविंद देशमुख यांनी हा पुरस्कार नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात स्वीकारला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान दरवर्षी राबवला जाते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण राष्ट्रीय सेवा योजना विभाग, महामार्ग पोलिस, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सेवा योजना कक्ष यांच्या संयुक्तपणे रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले. यासाठी विद्यापीठाच्या वतीने सर्व महाविद्यालयांना आवाहन करण्यात आले होते. त्यामध्ये महाविद्यालयाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यापीठाने हे अभियान यशस्वीपणे राबवल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने यावर्षी ‘महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०१५’ हा पुरस्कार देऊन विद्यापीठाचा सन्मान करण्यात आला.

विद्यापीठासोबत विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांपैकी अकोला जिल्ह्यातील खडकी येथील बाबासाहेब धाबेकर महाविद्यालय बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री ज्ञानेश्वर मस्कूजी बुरंगुले विज्ञान महाविद्यालय यांना स्मृतिचिन्ह प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाच्या वतीने संचालक विद्यार्थी कल्याण डॉ. अरविंद देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला, तर महाविद्यालयाच्या वतीने अकोला जिल्हा समन्वयक प्रा. व्ही. एच. हिवरे, प्रा. संगीता नाईक, प्रा. अमरीश गावंडे, डॉ. आर. ई. खडसान, डॉ. पी. व्ही. पिंगळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या वेळी रासेयो विभागातील राजेश पिदडी यांची उपस्थिती होती. पुरस्काराबाबत कुलगुरू डॉ. मोहन खेडकर, प्र-कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके, कुलसचिव प्रा. दिनेशकुमार जोशी यांनी रासेयो समन्वयक डॉ. अरविंद देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे कौतुक केले.