आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून साहसी क्रीडा प्रकार पर्यटन महोत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागील काही वर्षांपासून जिल्हावासियांचे आकर्षण ठरलेल्या चिखलदरा महोत्सवाला शुक्रवारपासून(दि.२३) सुरूवात होत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच यंदा साहसी क्रीडा प्रकार पर्यटन महोत्सवाचे खास वऔशिष्ट्य मानले जात आहे.

पुढील तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच रांगोळी रेखाटन, छायाचित्र प्रदर्शनी हे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. स्थानिक जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि नगर परिषद चिखलदरा यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात शुक्रवारी पहिल्याच दिवशी सकाळी ११ वाजता पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते उदघाटन होईल.अध्यक्षस्थानी आमदार प्रभुदास भिलावेकर राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ.सुनील देशमुख, पर्यटन विभागाच्या सचिव वलसा नायर, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, नगराध्यक्ष राजेन्द्रसिंह सोमवंशी यांची उपस्थिती राहील. महोत्सवात मध्यंतरी चार वर्ष खंड पडला होता यामुळे यंदाच्या महोत्सवाविषयीची उत्सुकता वाढली.

महोत्सवात आजचे कार्यक्रम
२३जानेवारी
*सकाळीते १० रांगोळी रेखाटन.
*९ ते १० फेरी, लेजीम, पतंगत्सोव.
*११ ते १:३० पर्यंत उदघाटन.
*आदिवासी नृत्य, प्रदर्शनी, विशेषांक, विविध कलादालनांचे उद््घाटन या कार्यक्रमांचा समावेश .
*दुपारी १:३० ते पर्यंत पॅरासेलिंग, व्हॅलिक्रॉसिंग, रॉकक्लायंबीग, हॉट एअर बलून इ. साहसी उपक्रम.
*२:३० ते खंजिरी भजन स्पर्धा.
*६:३० ते ७:०० मशाल महोत्सव.
*सायं. ते ९:३० विदर्भ संध्या कार्यक्रम.