आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chikhaldara Tourism Festival Started At Amravati

साहस, थरार आणि संस्कृतीची चिखलदऱ्यात होणार उधळण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जानेवारी महिन्याच्या अखेरीस आलेल्या सलग सुट्या आणि याच दरम्यान आयोजित चिखलदरा पर्यटन महोत्सवामुळे अमरावतीकरांना निसर्ग पर्यटनाची नामी संधी चालू आली आहे.

येत्या २३ ते २५ जानेवारीदरम्यान ‘विदर्भाचे नंदनवन’ असलेल्या चिखलदरा येथे होणाऱ्या या पर्यटन महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह रांगोळी रेखाटन मेळघाटमधील वन्यजीवांचे दर्शन घडवणारी छायाचित्र प्रदर्शन भरवले जाणार आहे. साहस, थरार आणि संस्कृतीची उधळण या घोषवाक्यांवर आधारित असलेला हा पर्यटन महोत्सव प्रत्यक्षात साकारण्यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि चिखलदरा नगर परिषदेची यंत्रणा कामाला लागली आहे.

उद्याहोणार उद््घाटन : महोत्सवाचेउद््घाटन शुक्रवारी( दि.२३) सकाळी ११ वाजता पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते होणार आहे. स्थानिक आमदार प्रभुदास भिलावेकर अध्यक्षस्थानी राहतील. आमदार डॉ. सुनील देशमुख, पर्यटन विभागाच्या सचिव वलसा नायर, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, चिखलदराचे नगराध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

चिखलदरा ‘हाउसफुल्ल’
२४,२५ आणि २६ अशा सलग तीन दिवस सुट्या असल्याने चिखलदरा येथे पर्यटकांची मोठी गर्दी होणार आहे. याकरिता मागील महिन्याभरापासूनच चिखलदऱ्यातील रिसोर्ट, हॉटेल्स आणि साहसी क्रीडाप्रकाराचा आनंद घेण्यासाठी नोंदणी सुरू करण्यात आली होती. या नोंदणीला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येत्या तीन दिवसांत चिखलदऱ्यात पर्यटकांच्या गर्दीने फुलून जाणार आहे. चिखलदऱ्यातील हॉटेल्समध्ये सुमारे ७५ टक्के हॉटेल्सचे बुकिंग झालेले आहे.