आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाळ्यामध्ये जपा चिमुकल्यांचे आरोग्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पावसाळ्याच्या उंबरठय़ावर वातावरणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर लहान मुलं व ज्येष्ठांच्या आरोग्याच्या तक्रारीत वाढ होत असल्याने साथीच्या आजारांपासून बचाव करण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे. दूषित पाणी, शिळे अन्न, वातावरणातील गारठय़ामुळे चिमुकली मुलं आणि ज्येष्ठांच्या आरोग्यविषयक तक्रारी वाढतात. पावसाळ्यात लहान मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पाणी तुंबणार्‍या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानेही आजारांमध्ये वाढ होत आहे. हिवताप, मलेरिया, टायफॉइड, सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, असे आजार पावसाळ्यात डोके वर काढतात. एक वर्षातील बाळांना रोटा व्हायरसमुळे डायरिया होण्याचा धोका असतो. त्यांची विशेष काळजी घ्यावी, असेही डॉक्टरांनी सांगितले.
तज्ज्ञ म्हणतात, आरोग्य सांभाळा
चिमुकल्यांसह ज्येष्ठांचेही आरोग्य सांभाळावे, मागील वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला कावीळ, टायफाइड, डायरिया या आजारांची साथ होती. लहान मुले आणि ज्येष्ठांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना साथीच्या आजारांची लागण लवकर होऊ शकते. त्यामुळे वातावरण बदलाच्या काळात मातांनी कटाक्षाने लहान मुलांची काळजी घ्यावी. डॉ. हृषिकेश नागलकर, बालरोगतज्ज्ञ
मुलांना द्या शंभर टक्के शुद्ध पाणी

पावसाळ्यात दूषित पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता असते. त्यामुळे विविध आजार उद्भवतात. मुलांना उकळलेले शंभर टक्के शुद्ध पाणी पिण्यासाठी द्यावे. दहा मिनिटे पाणी उकळून शुद्ध करण्याची सोपी आणि शाश्वत पद्धत अवलंबवावी, असे सल्ला डॉक्टर देत आहेत.
ही घ्यावी काळजी-
वैयक्तिक स्वच्छतेकडे द्यावे लक्ष
साबणाने हात धुतल्यानंतरच जेवण करावे.
पावसात भिजणे टाळावे
पावसातून आल्यास फॅनचा वापर नसावा.
गारठय़ापासून चिमुकल्यांचा बचाव करण्यासाठी गरम कपडे वापरावे.
उघड्यावरील खाद्यपदार्थ आणि पाणी टाळावे.
बाहेर पडताना नाकाला रूमाल बांधावा.
कोमट पाणी प्यावे
पावसाळ्यात कोमट पाणी प्यावे. सर्दी, खोकला, डोकेदुखीसारख्या आजारांना घालवण्यासाठी घरगुती उपचार करावा. सुंठ, पारिजातकाची पाने, गवती चहा, मिरे याचा काढा सकाळ आणि सायंकाळी साधारण 50 एमएल घेता येईल. लहान मुलांनाही ते देता येईल. वैद्य प्रसाद आमले, आयुर्वेदाचार्य
पावसाळ्यामध्ये जपा चिमुकल्यांचे आरोग्य