आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोषण आहारासाठी विद्यार्थ्यांची राबवणूक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्रस - दिग्रस येथील दिनबाई शाळेत विद्यार्थ्यांकडून शालेय पोषण आहाराच्या बॅग्ज उतरवून घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हितेश गोसर यांना शाळेचा गणवेश घातलेली मुलं शालेय पोषण आहाराच्या बॅग्ज उतरवताना दिसली. त्यांनी तत्काळ ते दृश्य आपल्या मोबाइलमध्ये कैद केले. हा प्रकार शिक्षण विभागातील अधिका-यांपर्यंत पोहोचवण्यासोबतच सोशल साइटवर ही छायाचित्रे टाकली आहेत.

केंद्र सरकार बालमजुरी संपवून प्रत्येक बालकाला शिक्षण देण्यासाठी धडपडत असताना हा प्रकार निश्चितच निंदनीय असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञ व जागरूक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.सरकार बाल सक्षमीकरण, बालमजुरीचे उच्चाटन, बालसंरक्षण, त्यांचे हक्क यांसाठी अनेक आघाड्यांवर लढत आहेत. समाजात जनजागृती निर्माण करण्यासोबत कायद्याचा बडगा उगारूनही या प्रकारांना आळा घालण्यासाठी अनेक पावले उचलण्यात येत आहेत. मुलांना शाळेची ओढ लागण्यासोबतच शिक्षण आनंददायी होण्यासाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत. एकप्रकारे अशा प्रकारे सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसत असतानाच असले प्रकार उघडकीस येत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
पालकांमध्ये रोष
शुक्रवारी दिनबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून शालेय पोषण आहाराची पोती उतरवून घेतल्याचा प्रकार सोशल मीडियावर झळकताच शेकडो पालकांनी यावर रोष व्यक्त केला. शाळांमध्ये मुलांना शिक्षण घेण्यासाठी पाठवले जाते, की हमाली करण्यासाठी, असा प्रश्न पालकांमधून पुढे येत आहे.

कारवाई करणार
आम्ही विद्यार्थ्यांना कोणतेही काम करायला सांगत नाही. शासकीय नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात येते. पोषण आहार बनवणा-यांनी असा काही प्रकार केला असल्यास त्याची चौकशी करण्यात येईल. तथ्य आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. पालकांनी तोर्यंत
संयम बाळगावा विजयकुमार बंग, अध्यक्ष, दिनबाई शिक्षण संस्था, दिग्रस.