आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chill Atmosphere In Amravati, Latest New, Divya Marathi

गारठय़ाने आजारांमध्ये वाढ; नागरिक हैराण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-आठवड्यात वादळी वार्‍यासह गारपिटीमुळे गारठा वाढल्याने खासगी, शासकीय रुग्णालयांत ताप, सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या आजारांसह, टायफॉइड, अतिसाराच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशा वेळी विशेषत: लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
अकाली पावसामुळे वातावरणात एकदमच बदल झाला आहे. पारा घसरला आहे. लहानग्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने वातावरणातील बदलांचा त्यांच्यावर लवकर परिणाम होतो. त्यांना बाळदमा, न्युमोनिया अशा आजारांचा त्रास संभवतो. तेव्हा गारव्यापासून मुलांचा बचाव करावा; त्यांना अशा वातावरणात फिरवू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. विषाणुजन्य आजारांपासून बचावासाठी डॉक्टरांनी काही ‘टिप्स’ दिल्या आहेत.