आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आवाज बुलंद!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनास अवघा महिनाभराचा कालावधी उरला आहे. त्यासाठी आमदारांनी जिल्‍ह्याच्या विकासासंबंधीच्या प्रश्नांची सोडवणूक प्रकल्प खेचून आणण्यासाठी तयारी चालवली आहे. जिल्‍ह्यातील आठही आमदारांकडून आपण ते जाणून घेणार आहोत. त्यातील हा पहिला भाग...
२. महापालिकाक्षेत्रात स्वच्छतेच्या नावावर अस्वच्छता पसरली आहे. दैनंदिन साफसफाई व्यवस्थित होत नाही. शहर स्वच्छतेचा प्रश्न सोडवून नागरिकांचे आरोग्य सुधारण्यावर भर देणार.
३.जिल्‍हासामान्य रुग्णालय जिल्‍हा स्त्री रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी योजना तयार करण्याचे ठरवले आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
४.औद्यौगिकदृष्ट्याजिल्‍हा पिछाडीवर आहे. शहरात रोजगार निर्मिती करणारे मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मागीलपाच वर्षांमध्ये शहरात नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचा गुणात्मक दर्जा तपासावा लागणार आहे. कारण त्यांची गुणवत्ता चांगली नसून, त्यांचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणार. संबंधित कंत्राटदार महापालिकेचे अधिकारी यास जबाबदार असून त्यांना जाब विचारण्यात येईल.