आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य अधिकाऱ्यांवरच होईल आता थेट कारवाई, १५ फेब्रुवारीपर्यंतचा ‘अल्टिमेटम’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील साफसफाईचा मुद्दा तातडीने निकाली निघाल्यास आरोग्य अधिकाऱ्यांवरच कारवाई केली जाईल, अशी ताकीद मनपा स्थायी समितीचे सभापती मिलिंद बांबल यांनी दिली आहे.

स्थायी समितीच्या सुदामकाका देशमुख सभागृहात शुक्रवारी सायंकाळी आरोग्य विभागाची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी ही सूचना-वजा-ताकीद दिली आहे. मोकाट जनावरे, श्वानदंशाच्या वाढत्या घटना, साफसफाईची दुरवस्था आणि नागपुरात उद्भवलेला स्वाइन फ्लू या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.
फुटलेले कंटेनर, सार्वजनिक ठिकाणांशिवाय कंटेनरशेजारी पडणारा कचरा आदी तक्रारींचा आधार घेत शहराच्या साफसफाईत कमालीची उदासीनता असल्याचे या वेळी स्पष्ट झाले. हा मुद्दा उघड झाल्यानंतर बांबल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दुरुस्तीसाठीची ताकीद दिली. त्यांच्या मते, कंटेनर दुरुस्त झाल्याशिवाय कंत्राटदारांची देयके दिली जाता कामा नये.

बैठकीला दोन्ही उपायुक्त विनायक औगड चंदन पाटील; मनपाचे दोन्ही आरोग्य अधिकारी डॉ. श्यामसुंदर सोनी डॉ. देवेंद्र गुल्हाने, इतर अधिकारी डॉ. अजय जाधव डॉ. सुधीर गावंडे, पशुशल्य चिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे, आरोग्य विभागाचे अधीक्षक एम. ए. खान स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

‘त्या’ स्वच्छता निरीक्षकांना ‘शो कॉज’
मनपात२३ स्वच्छता निरीक्षक (एसआय) आहेत. या सर्वांनाही आजच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्यांपैकी केवळ १८ जणच उपस्थित होते. त्या सर्वांना कारणे दाखवा (शो कॉज) नोटीस देण्याचा आदेश देण्यात आला आहे.

घरोघरी करणार जनजागृती
-बैठकीतझालेल्या निर्णयानुसार स्वाइन फ्लू इतर आजारांच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची खबरदारी व्यक्त करणारी पत्रके घरोघरी वितरित केली जाणार आहेत. याशिवाय ‘टॅमी फ्लू’च्या गोळ्यांचे वितरण तसेच मनपा दवाखान्यांमध्ये आवश्यक त्या औषधांची उपलब्धताही करून दिली जाणार आहे. मिलिंदबांबल, सभापती, स्थायी समिती, महानगरपालिका, अमरावती.