आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश डावलून धनादेश; उपायुक्तांनी घेतली लेखाधिकाऱ्यांच्या कक्षात संबंधितांची झाडाझडती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेच्या२६ प्रभागांमधील दैनंदिन साफसफाई कंत्राटदारांची डिसेंबर २०१३ ची सुमारे ७१ लाख रुपयांची देयके प्रलंबित आहेत. थकीत बिले मिळावीत, यासाठी कंत्राटदारांनी काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांची भेट घेतली होती. कर्मचाऱ्यांची भविष्यनिर्वाह निधी, ईएसआयसी तसेच स्थानिक संस्था कर चालान रकमेचा भरणा करण्यात आल्याशिवाय साफसफाई कंत्राटदारांचे धनादेश काढले जाऊ नयेत, असे स्पष्ट आदेश आयुक्त अरुण डोंगरे यांनी दिले होते.
याबाबत, बुधवारी (१० सप्टेंबर) आयुक्तांनी लेखा विभागामार्फत आलेल्या नोटशीट पत्रावर याबाबत आदेशित केले होते. साफसफाई कंत्राटदारांची देयके देताना दुजाभाव होत असल्याचे अनेकजण बोलत होते. मुख्य लेखाधिकारी शैलेंद्र गोसावी यांनी सोमवारी (दि. १५) प्रभाग क्रमांक ३५ मधील वाल्मीकी सफाई कामगार नागरी सेवा संस्था तसेच प्रभाग क्रमांक ४३ मधील जगदंबा स्वयं नागरी सेवा सहकारी संस्था आदी कंत्राटदारांची देयके काढली. मुख्य लेखाधिकाऱ्यांनी दोन कंत्राटदारांवर मेहेरबानी दाखवल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे. आर्थिक घडी विस्कटली असताना मुख्य लेखाधिकाऱ्यांकडून देयके काढली...
कंत्राटदारांच्या कागदपत्रांची तपासणी
दोघांनानियमबाह्यपणे धनादेश दिल्याची तक्रार अन्य कंत्राटदारांकडून करण्यात आली होती. या वेळी कंत्राटदारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी, ईएसआयसी रकमेचा भरणा करण्यात आला किंवा नाही, याबाबत आरोग्य विभागाकडे विचारणा करण्यात आली. धनादेश दिलेल्या दोन कंत्राटदारांकडून चालानच्या रकमेचा भरणा करण्यात आल्याचे आढळून आले आहे. रमेशमवासी, उपायुक्तपालिका.

मनपा आयुक्त अरुण डोंगरे यांच्याकडून देण्यात आलेले आदेश नोटशीटवर स्पष्टपणे दिसून येत आहे.

दोन प्रभागांतील कंत्राटदारांवर लेखाधिकारी मेहेरबान
महापालिका आयुक्तांचे आदेश डावलत मुख्य लेखाधिकाऱ्यांनी दोन साफसफाई कंत्राटदारांचे धनादेश काढल्याचा धक्कादायक प्रकार पालिकेत सोमवारी उघडकीस आला. सेवानिवृत्तांना पेन्शन, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसे नसताना कंत्राटदारांचे धनादेश काढल्यामुळे पालिकेत वादंग निर्माण झाला आहे. अन्य कंत्राटदारांकडून तक्रार करण्यात आल्यानंतर उपायुक्त रमेश मवासी यांनी मुख्य लेखाधिकारी शैलेंद्र गोसावी यांच्या कक्षात संबंधितांना पाचारण करून चांगलीच झाडाझडती घेतली.
एकाच वेळी द्यायची होती रक्कम : भविष्यिनर्वाह निधी, ईएसआयसी एलबीटी चालानचा भरणा केल्याशिवाय धनादेश देऊ नयेत, असे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. ४३ प्रभागांतील कंत्राटदारांची देयके एकाच वेळी देण्याबाबत नोटशीटमध्ये सूचित करण्यात आले आहे. ७१ लाख ३६ हजार ०७० रुपये कंत्राटदारांची देयके एकाच वेळी देण्याबाबत उपायुक्तांनी बुधवारी (१० सप्टेंबर) नोटशीटवर शेरा लिहिला होता; तसेच याबाबत खुलासादेखील करण्याचे सूचित केले होते.
पदाचा विवाद : लेखाविभागातील एका कर्मचाऱ्याची बदली कार्यशाळा विभागात करण्यात आली आहे. मात्र, लेखा विभागातील सद्य:स्थितीत निर्माण झालेली स्थिती पाहता दोन-तीन तासांकरिता त्या कर्मचाऱ्याची पुन्हा लेखा विभागात प्रतिनियुक्ती केल्याची माहिती आहे. मात्र, पूर्वी बदलून आलेल्या कर्मचाऱ्याकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या कर्मचाऱ्यास पदभार दिला जात नसल्याची मािहती पुढे आली आहे. लेखा विभागातील पदांचा हा खेळसुद्धा आयुक्तांच्या दालनात जाण्याची चिन्हे आहेत.