आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणातील बदलांमुळे आजारांना निमंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- सध्याशहरात गढूळ दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. गढूळ पाण्यासोबतच वातावरणातील बदलामुळे नागरिकांच्या दवाखान्यातील चकरा वाढल्या आहेत. दिवसभर गरम होणे, दुपारी अचानक नभ दाटून येणे रात्रीतून पाऊस पडणे आदी हवामानातील या बदलांमुळे नागरिकांना विविध अाजारांना तोंड द्यावे लागत आहे. या बदलांमुळे डोके दुखणे, मळमळ होणे तथा अंग दुखणे आदी विविध आजारांच्या तक्रारी वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पावसाळा सुरू झाला असून, पाण्याचे स्रोत दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कावीळ, अतिसार, विषमज्वर आदी रोगांची लागण होण्याची शक्यता आहे. पावसाचे पाणी साचून होणाऱ्या डासांमुळे मलेरिया, चिकनगुनिया या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेतील आरोग्य विभागाने केले आहे. डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी घरातील पाणी साठवणुकीचे भांडे, पाण्याच्या टाक्या इत्यादी साहित्य आठवड्यातून किमान एक दिवस कोरडे ठेवावे, नळाद्वारे गढूळ पाणी आल्यास पिण्याच्या पाण्यात जीवनड्रॉप टाकावा, त्यानंतर पाणी पिण्यासाठी वापरण्याचे आवाहन महापालिकेेने केले आहे.

नागरिकांनी हे करावे
नागरिकांनीपिण्याचे पाणी उकळून गाळून पिण्यासाठी वापरावे, नळजोडणी, पाइप, गटार किंवा घाण पाण्यातून जाऊ नये, शिळे खराब झालेले तसेच उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत, क्लोरिनद्वारे शुद्ध असलेलेच पाणी पिण्यासाठी वापरावे, आजारी व्यक्तींना त्वरित रुग्णालयात दाखल करावे, हॉटेल, खानावळ फिरत्या विक्रेत्यांकडील, तसेच उघड्यावरील अन्नपदार्थांचे सेवन करू नये, घराभोवती पावसाचे पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, साचलेल्या पाण्यावर रॉकेलचे द्रावण टाकावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
गढूळ पाण्याचा पुरवठा
शहरात काही भागांत अजूनही गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाइपलाइनमधून पिण्याचे गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. दूषित पाणीपुरवठा हेही आजाराचे मुख्य कारण असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले.

दूषित पाण्यामुळे डायरिया, उलटी, हगवण, कावीळ, कॉलरा, टायफाइड अशा आजारांचा धोका असतो. वातावरणातील बदलांमुळेे व्हायरल फीव्हरचे प्रमाण वाढले आहे. पाणी उकळून पिल्यास बहुतांश पाण्यापासून होणारे आजार होणार नाही. डॉ.अशोक वनकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक,अमरावती.
आरोग्य सांभाळा