आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Devendra Fadnavis Good Relation With Amravati

मुख्यमंत्र्यांनी अमरावतीत घेतले होते ‘कुस्ती’चे धडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लाठी-काठी कुस्ती या मातीतल्या खेळात चांगलाच हातखंडा आहे. राजकारणाच्या आखाड्यातही सरस डाव टाकत भल्याभल्यांना चीत करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुस्ती या मातीतल्या खेळातही चांगलाच हातखंडा आहे. अमरावतीच्या मातीतच त्यांची या डावपेचांची पायाभरणा झाली आहे. श्री हनुमान व्यायाम शाळेतून त्यांनी क्रीडा प्रशिक्षण घेतले आहे.

तो काळ होता १९८३ मधील जून महनि्यातला. आता राज्याची धुरा सांभाळणारे देवेंद्र फडणवीस तेव्हा दहावीत शिकत होते. त्यांनी येथून व्यायाम प्रवेश अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांना लाठीकाठी या पारंपरिक खेळातही चांगलेच प्रावीण्य होते, असे हनुमान शाळेतील तज्ज्ञ सांगतात. कुस्ती लाठीकाठी, या दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये त्यांना ६० टक्क्यांच्या आसपास गुण होते, अशी आठवण येथील तज्ज्ञ सांगतात. मुख्यमंत्र्यांना मातीतील खेळांप्रती आत्मीयता असल्यामुळे क्रीडा क्षेत्रास चांगले दविस येतील, अशी आशा क्रीडातज्ज्ञांनी वर्तवली आहे. खो-खो किंवा कबड्डीचे सामने बघताना मुख्यमंत्री वेळेचेही भान विसरतात, असे सुहास खांडेकर म्हणतात.

खेळांवर प्रेम
देवेंद्रयांचे बालपणापासूनच खेळावर प्रेम आहे. लाडके भाचे असल्यामुळे मामकुळी आले, की आम्ही त्यांना मनसोक्त खेळू, बागडू देत होतो. त्या वेळी खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘एचव्हीपीएम’चेही त्यांना आकर्षण होते. त्यामुळे त्यांनी १९८३ मध्ये मोठ्या आवडीने व्यायाम प्रवेश अभ्यासक्रम पूर्ण केला. चंद्रकांतकलोती, देवेंद्रयांचे मामा
पुढील स्‍लाइवर पाहा, त्‍यांना किती मिळाले गुण ..