आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २९ तारखेला अमरावतीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वनियोजित दौऱ्यामध्ये बदल झाला आहे. आगामी २३ नोव्हेंबरला ते अमरावती जिल्‍ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र, आता नवीन कार्यक्रमानुसार ते २९ नोव्हेंबरला एक दिवसाच्या दौऱ्यावर येणार असल्याचे जिल्‍हाधिकारी िकरण गित्ते यांनी सांगितले. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, विभागीय आयुक्तालयात शुक्रवारी पाचही जिल्‍ह्यांच्या मॅराथॉन बैठकी पार पडल्या.
बैठकीमध्ये विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशीम या पाचही जिल्‍ह्यांच्या जिल्‍हाधिकाऱ्यांकडून संबंधित जिल्‍ह्यातील विविध विभागांचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याअगोदर या पूर्वतयारीसाठी बैठका सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले. या बैठकीला जिल्‍हाधिकारी किरण गित्ते यांच्यासह विभागांतील सर्व प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते.