आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी सक्षम व्हावा यासाठी समन्वय गरजेचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने कार्य करण्याची गरज असल्याचे मत राज्याचे अपर मुख्य सचिव सुधीर कुमार गोयल यांनी व्यक्त केली. विदर्भात शेतकरी आत्महत्या हा गंभीर विषय असून विविध खासगी, नागरी सेवाभावी संस्थांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कृषी समृध्दी योजनेचा आढावा घेताना ते आज (२२ जून) बोलत होते.

कृषी विभाग सीएआयएम (समन्वयीत कृषी विकास प्रकल्प) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्पाव्दारे झालेल्या उद्दिष्ट पुर्तीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. डिसेंबर २००९ पासून वर्धा जिल्ह्यासह अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर राज्यभर प्रकल्पाची अमंलबजावणी होणे आवश्यक आहे, असे विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी सांगितले.

या बैठकीमध्ये कृषी विकास प्रदर्शनी २०१५, ॲग्रो प्रदर्शनी २०१५, मृदा परिक्षण, गाव पातळीवर शिबीर, खरीप हंगाम पूर्व पेरणी प्रशिक्षण, हवामान बदल उपाययोजना याविषयावर चर्चा लक्षांक पूर्ती संबधी माहिती देण्यात आली.

प्रत्येक गावातील २०० ते ३०० कुटुंबांना विविध कृषी योजनांचा लाभ दिला असून महिला बचत गटातील ५००० कुटुंबांना व्यवसायाकरीता आर्थिक सहाय्य देण्यात आल्याची माहिती प्रकल्प संचालक रवींद्र ठाकरे यांनी दिली .
यावेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, विभागीय कृषी सहसंचालक शु. रा. सरदार, प्रकल्प संचालक रवींद्र ठाकरे, कृषी विकास निधी (आयएफएडी) टाटा ट्रॅस्टचे संबंधित अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीला कृषी विभाग समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाचे अधिकारी-कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सेवानिवृत्तीनिमित्त केला सत्कार
राज्याचेअपर मुख्य सचिव सुधीर कुमार गोयल ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. केम प्रकल्पाच्या विविध बाबींचा आढावा घेण्यासाठी आले असता अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांचा अधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात गोयल यांचा विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

केमप्रकल्पाचे उद्दिष्टे
शेतकरी आत्महत्या रोखणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांना वैविध्य‍यपूर्ण शेती आणि कृषियेत्तर उत्पन्नांच्या साधनांव्दारे आर्थिक उत्पन्नात वाढ करणे, शेती आधारीत अति लघु आणि लहान मध्यम प्रकल्प, उद्योगांची उभारणी , सेंद्रिय शेती किमान निविष्ठांची कंत्राटी शेतीपध्दती अवलंबून कृषी विकास करणे, सुक्ष्म वित्तपुरवठा आणि अति लघु उद्योगांद्वारे महिला सक्षमीकरण करणे, आदी उपक्रम प्रकल्पाव्दारे राबविले जातात.
विभागीय आयुक्त कार्यालयात कृषी समृद्धी योजनेचा आढावा घेताना मान्यवर
बातम्या आणखी आहेत...