आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाशी गाठ, सोबतीला आलाय बंगाली माठ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- वैशाखातील धग संपत नाही तोच रोहिणीतील नवतपाच्या कडाक्याने जिवाची काहिली होत आहे. या दिवसांत मातीपासून बनवलेल्या मातीच्या माठातील पाणी जिवाला गारवा प्रदान करीत असते. बंगाल, मध्यप्रदेशातील बैतुल येथून आलेले नक्षीदार माठ अमरावतीकरांना आपल्याकडे खेचून घेत आहेत. आकर्षक रचनेमुळे त्यांची मोठय़ा प्रमाणावर खरेदी होत आहे.
बंगालमधील भगीरथी, हुगळी, ब्रह्मपुत्रा यांच्यासह इतर छोट्या-मोठय़ा नदीपात्रांतील शाडू मातीपासून हे माठ तयार केले जातात. प्रसंगी दाजिर्लिंग येथील चहाच्या मळ्यातील मातीपासूनही हे माठ बनवले जातात. यालाच कोलकाता माठ किंवा दाजिर्लिंग माठ म्हणूनही ओळखले जाते. लांबट उभ्या आकराचे लाल रंगातील हे माठ छोट्या टाकीसारखे दिसतात. वरून याला झाकायला झाकणही आहे. आकर्षक नक्षी असलेले हे माठ 125 ते 250 रुपयांपर्यंत विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. यांना स्टील व प्लास्टिकचे नळ बसवण्यात आलेले आहेत. इर्विन चौक, सबणीस प्लाट, कल्याणनगर, मोतीनगर या ठराविक ठिकाणीच मिळणार्‍या माठांना अमरावतीकरांनी पसंती दर्शवली आहे.
मध्यप्रदेशातील बैतुल येथील लहान-मोठय़ा आकारातील माठांनाही मागणी आहे. हे माठ यवतमाळ जिल्ह्यातील बोरी अरब येथून येणार्‍या पारंपरिक माठांप्रमाणेच, पण सपाट आहेत. यांच्या आकरानुसार किमतींमध्ये बदल होतो. 80 ते 250 रुपयांपर्यंत ते उपलब्ध आहेत. या माठांना नळ नसतो. ऑर्डरनुसार तो लावून दिला जातो, असे विक्रेत्यांनी सांगितले. कोलकाता, बैतुल माठांच्या तुलनेत पारंपरिक माठही आपले अस्तित्व टिकवून आहेत.
आणखी वाचा पुढील स्‍लाईडवर ...