आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी गित्ते यांना पंतप्रधान पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावर लोकप्रशासनात उत्कृष्ट कार्याचा गौरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पश्चिम त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे राबवलेल्या आर्थिक समावेशन प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची यंदाच्या पंतप्रधान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मंगळवारी (२१ एप्रिल) नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. एक लाख रुपये रोख, पदक, प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पंतप्रधान पुरस्कारासाठी निवड होणारे किरण गित्ते हे महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी आहेत.
राष्ट्रीय स्तरावर लोकप्रशासनात उत्कृष्ट नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दरवर्षी २१ एप्रिलला रोजी लोकप्रशासन दिनी हा पुरस्कार देवून गौरवण्यात येते. विशेष पुढाकार घेऊन राबवलेल्या योजना, प्रकल्पामुळे संख्यात्मक गुणात्मक वाढ झाली आहे. अशा अधिकाऱ्यांना यासाठी अधिकाऱ्यांनी राबवलेल्या योजना, त्यांच्या नावीन्यपूर्ण पद्धती, योजना पूर्णत्वास नेण्यासाठी वापरलेली कल्पकता, पूर्णत्वास नेण्याचा कालावधी, सकारात्मक बदल, त्याचा सार्वजनिक जीवनावर झालेला दृश्य परिणाम आदी बाबी विचारात घेतल्या जातात.

पंतप्रधानांनी घेतली कार्याची दखल
सुमारे१७ लाख लोकसंख्येच्या आदिवासीबहुल जिल्ह्यात सर्व गावांतील सर्व कुटुंबांना बँकिंग सेवा प्रदान करून गित्ते यांनी केंद्र राज्य शासनाच्या योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवला. प्रधानमंत्री जन-धन योजनेपूर्वी २०१३-१४ मध्ये ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्यात गित्ते यांनी राबवलेल्या आर्थिक समावेशन या प्रकल्पावर आधारित प्रधानमंत्री जन-धन योजनेचा पाया रचला गेला. याची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. यासाठी त्यांना गाैरवण्यात येणार अाहे.