आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिजन २०२० : टार्गेट ठरले;कामाला लागा, जिल्‍हाधिकाऱ्यांचे सर्व विभागांना आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती जिल्ह्याच्या नियोजनबद्ध सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने व्हीजन- २०२० तयार करावयाचे असून त्याची सुरूवात आहे. व्हीजन डॉक्युमेंट तयार करतांना अधिकाऱ्यांनी आपला विभाग सध्या कुठे आहे. विभागाच्या सुधारण्याच्या दृष्टीने कोणते पर्याय आहेत, ते निवडावेत. खर्चाची मर्यादा ठेवता नियोजनबद्ध आराखडा तयार करुन प्रकल्प अहवाल सादर करावा असे स्पष्ट निर्देश जिल्‍हाधिकारी किरण गिते यांनी गुरुवारी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरात बचत भवन येथे आयोजित ‘अमरावती जिल्हा व्हीजन डॉक्युमेंट’, या जिल्हास्तरीय कार्यशाळेत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना कामाला लागण्याची सूचना केली.

अमरावती जिल्हा ही संतांची जन्मभूमी, कर्मभूमी आहे. जिल्ह्यात निसर्ग साधनसंपत्ती मानव संसाधने विपुल प्रमाणात आहेत. या साधनसंपत्ती संसाधनांचा विकास कार्यात उपयोग करुन घेण्यासाठी दिर्घ मुदतीचे व्हीजन डॉक्युमेंट आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी गित्ते म्हणाले. महापालिकेचे आयुक्त अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, मुख्य वन संरक्षक गौड, निनु सोमराज, जिल्हा नियोजन अधिकारी डी. टी. राठोड तसेच जिल्हास्तरीय अधिकारी कार्यशाळेस उपस्थित होते. या प्रसंगी, अधिकाऱ्यांनीही अमरावतीच्या विकासासाठी नेमके काय करता येईल या संबंधी विचार मांडले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक उपस्थितांचे स्वागत रवींद्र धुरजड यांनी केले.

व्हीजन २०२० च्या माध्यमातून गुरुवारी झालेल्या कार्यशाळेत प्रत्येक विभागातील मुख्य अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आपला आराखडा प्रोजेक्टरच्या माध्यमातून मांडला. सर्वच विभागातील आराखडा मिळून जिल्ह्याच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करण्यात येईल. येत्या दोन ते अडीच महिन्यात जिल्ह्याचा हा विकास आराखडा तयार होईल.
जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने प्रत्येक विभागाने चांगले स्वप्न पहावे म्हणजे साकार होईल. व्हीजन डॉक्युमेंटमध्ये सामाजिक भावनांची जाणीव असावी. आपण औद्योगिक क्षेत्रात मागे आहोत त्या दृष्टीने व्हीजन डॉक्युमेंटमध्ये उद्योग विकासाचा समावेश असावा. नवीन शासनाचा विकास कामावर भर आहे. त्यादृष्टीने आपणही विकासावर आधारीत व्हीजन डॉक्युमेंट तयार करावे.