आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Collector Rahul Ranjan Mahiwal, Latest News In Divya Marathi

पुन्हा मिळणार अनुदानित दरानेच सिलिंडर -जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- 10 मार्चपासून जिल्ह्यातील गॅस ग्राहकांना पुन्हा पूर्वीच्याच पद्धतीने अनुदानित दराने सिलिंडर खरेदी करता येणे शक्य होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी दिली आहे.
घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करण्याची योजना बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील गॅस ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.अनुदान थेट हस्तांतरण योजनेत गॅस ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. ग्राहकांना विनाअनुदानित दराने सिलिंडर खरेदी करावी लागत होते. त्यानंतर संबंधित ग्राहकांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येत होती. मात्र, बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होण्यासाठी आधार कार्ड क्रमांक वितरक आणि संबंधित बँकेत ‘लिंक’ करणे अनिवार्य होते. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.