आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमोहक फुलपाखरं अवतरली धरतीवर..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मृग कोरडा गेल्यानंतर हजेरी लावलेल्या पावसाने मेळघाटासह जिल्ह्याच्या सभोवतालच्या नैसर्गिक वैविध्यात चांगलीच भर घातली आहे. सृष्टीतील या हिरव्या बदलांनंतर फुलांच्या ताटव्यावर बागडणार्‍या, फुलांनाही हेवा वाटावा, अशी रंगबीरंगी फुलपाखरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. सुमारे आठ महिन्यांपर्यंत फुलपाखरांच्या संख्या वाढीचे हे प्रमाण कायम राहणार आहे.

मेळघाट, पोहरा, धारणी, चिखलदरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी फुलपाखरांच्या 135 प्रजाती आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. गणेश वानखेडे यांनी 135 प्रजाती शोधल्या आहेत. डॉ. जयंत वडतकर यांनी आपल्या थिसिसमध्ये 117 प्रजाती नमूद केल्या आहेत, तर वन्यजीवप्रेमी यादव तरटे यांनी 125 प्रजातींचा उल्लेख केला आहे. या सर्व प्रजातींच्या प्रजननाचा कालावधी आता सुरू झाल्याने फुलपाखरांचे प्रमाण तिपटीने वाढणार आहे.
डेनाइड एगफ्लाय दुर्मिळ फुलपाखरू
दुर्मिळ फुलपाखरांमध्ये ‘डेनाइड एगफ्लाय’ हे वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अँक्टमध्ये शेड्यूल्ड वन फुलपाखरू आहे. मोठय़ा आकाराच्या फुलपाखरांमध्ये ‘मलबार रोझ’,‘कॉमन बँडेड पिकॉक’, ‘पॅरिस पिकॉक’, तर ‘रेड पियरो’, ‘सिल्वर लाइन’ प्रकारातील फुलपाखरे व ‘जेझेबल’ दुर्मिळ आहेत. डॉ. जयंत वडतकर, वन्यजीव अभ्यासक.
डेनाइड एगफ्लाय मादी.
फुलपाखरं निरीक्षणासाठी
0 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसर.
0 पोहरा संरक्षित वनक्षेत्र.
0 धारणी वन परिक्षेत्र.
0 चिखलदरा परिसरातील वनक्षेत्र.
0 वडाळी तलाव परिसर.
0 छत्री तलाव परिसर.
प्रजननामुळे संख्यावाढ
पावसाला सुरुवात झाल्यानंतर नवी हिरवी पालवी फुलते. त्यामुळे फुलपाखरांना पुरेसे खाद्य मिळते. अशात प्रजननामुळे त्यांच्या संख्येतही वाढ होते. यादव तरटे, वन्यजीव

आढळणार्‍या प्रजाती
कॉमन इमिग्रेन्ट, मॉटल इमिग्रेन्ट, फोनटिजन, कॉमन लेपर्ड, स्मॉल ग्रास येलो, लेमन पॅनझी, येलो पॅनझी, ब्ल्यू पॅनझी, कॉमन क्रो, राइस स्वीफ्ट, बॅन्डेड औलसह आदी अनेक दुर्मीळ प्रजाती अमरावती जिल्ह्यात अस्तित्वात आहेत. त्यांचे रंगीबेरंगी पंख अनेकांना मोहून घेतात.