आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Commissioner Arun Dongre,latest News In Divya Marathi

दस-यापूर्वी महापालिका कर्मचा-यांना मिळणार वेतन; आयुक्त अरुण डोंगरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- दस-यापूर्वीपालिकेतील कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे थकीत वेतन दिले जाणार आहे. दसरा आनंदात साजरा करता यावा म्हणून आयुक्त अरुण डोंगरे यांनी कर्मचा-यांना वेतन देयकांना मंजुरी दिली. कर्मचारी संघटनांच्या संघर्ष कृती समितीने भेट घेतल्यानंतर आयुक्तांकडून हा सकारात्मक निर्णय घेण्यात आला.

मागील तीन महिन्यांचे वेतन थकीत असल्याने पालिका कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आर्थिक स्थिती अत्यंत खराब असल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देणेदेखील कठीण झाले होते. सप्टेंबर महिन्यात स्थानिक संस्था कराच्या वसुलीत बऱ्यापैकी वाढ झाली. मालमत्ता कराचे उत्पन्नदेखील प्राप्त होऊ लागल्याने किमान कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची व्यवस्था पालिकेजवळ झाली. कर्मचारी संघटनांच्या संघर्ष कृती समितीकडून सणांपूर्वी वेतन देण्याचा रेटा लावण्यात आला होता. त्यामुळे पालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी सफाई कामगार तसेच सेवानिवृत्तांना वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेवानिवृत्ती वेतन, चतुर्थश्रेणी कर्मचारी सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन, एलआयसी, जीपीएफ आदी असे एकूण तीन कोटी ७६ लाख रुपयांची देयकांवर आयुक्तांकडून मंजुरी देण्यात आली. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना लवकरच जुलै महिन्यातील वेतन मिळणार आहे.
कंत्राटदारांचीदेयके बाकी
दैनंदिनसाफसफाई कंत्राटदारांची तब्बल नऊ महिन्यांची देयके प्रलंबित आहेत. मागील आर्थिक वर्षातील कंत्राटदारांचा कंत्राटदेखील संपला, तरी त्यांना नऊ महिन्यांची देयके अद्याप मिळाली नाहीत. ही रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे.
अनेक कंत्राटदारांकडून कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी, जीपीएफ ईएसआयसी भरल्यानंतरदेखील त्यांना रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे साफसफाई कंत्राटदारांची देखील मोठ्या प्रमाणात बिले प्रलंबित आहेत. यामुळे कंत्राटदार त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
मोठा दिलासा
महापालिकाप्रशासनाने कर्मचारी कामगार संघर्ष कृती समितीच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतल्याने कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे.
दिवाळीपूर्वी तीन महिन्यांचे मिळणार वेतन
महापालिकाकर्मचारी कामगार संघर्ष कृती समितीसोबत झालेल्या बैठकीनंतर आयुक्त अरुण डोंगरे यांनी हा निर्णय घेतला आहे. दसऱ्यापूर्वी जुलै महिन्याचा, तर दिवाळी पूर्वी थकीत सर्व वेतन देण्याबाबत आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवल्याने थकीत तीन महिन्यांचे वेतन दिवाळी पूर्वी मिळण्याची आशा आहे. जानेवारी ते एप्रिल आदी चार महिन्यांचा डीएदेखील देण्याबाबत आयुक्तांकडून आश्वासन मिळाले आहे. प्रल्हादकोतवाल, सरचिटणीस,पालिका कर्मचारी कामगार युनियन.
सकारात्मक निर्णय घेतला
किमानएक महिन्याचे वेतन मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना दसरा साजरा करता येणार आहे. मोठा सण असलेल्या दिवाळीपूर्वी तिन्ही महिन्यांचे वेतन देण्याबाबतदेखील आयुक्त अरुण डोंगरे सकारात्मक असल्याने कर्मचारी आशावादी आहेत. मालमत्ता कराचे चांगले उत्पन्न प्राप्त होत असल्याने आयुक्तांनीदेखील कर्मचाऱ्यांना वेतन देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये निश्चित केल्याप्रमाणे आयुक्तांकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे कर्मचाऱ्यांनी स्वागत केले असून, मोठा दिलासा मिळाला आहे.