आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाव्यांनीही सुरू केली निवडणुकीची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - डावे पक्ष म्हणून ओळख असलेल्या भारतीय कम्युिनस्ट पक्ष व मार्क्सवादी कम्युिनस्ट पक्षानेही निवडणूकविषयक हालचाली सुरु केल्या आहेत. जिल्हाभर व्याप असला तरी अमरावतीसह बडनेरा, तिवसा, धामणगाव रेल्वे, अचलपूर व मेळघाट या सहा मतदारसंघात दोन्ही पक्षांचे खास प्राबल्य आहे.
त्यादृष्टिने दोन्ही पक्ष तयारीला लागले असून सभा, मेळावे, बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीचे वारे फुंकले जात आहे. लढवय्ये कार्यकर्ते आणि अभ्यासू पुढारी, ही या पक्षांची खरी ओळख आहे. मुद्दा कोणताही असो, एकदा उचलून धरला की तडीस जाईपर्यंत त्याचा पाठपुरावा करायचा, हे कम्युिनस्टांचे खास वैिशष्ट्य. त्यामुळे संख्येने कमी असले तरी निष्ठा मात्र कायम, असा त्यांचा व्यवहार असतो.
नेमक्या याच विचाराने भारावलेला जिल्ह्याचा काही भाग अजूनही त्यांची साथ देतो. त्यामुळे भांडवलदारधार्जिण्या इतर पक्षांसारखा त्यांचा बडेजाव नाही. परंतु निवडणुकांमध्ये निर्णायक ठरतील, एवढी शक्ती मात्र त्यांच्याकडे एकवटली आहे. सध्या दोन्ही पक्षात उमेदवारांची चाचपणी सुरु आहे.
ठरलेल्या सूत्रानुसार, तिकीट निष्ठावान आणि जुन्या कार्यकर्त्यालाच निळते. त्यामुळे आयाराम-गयाराम असा कोणताही व्यक्ती जो लौकीकार्थाने निवडणुकीच्या रिंगणात ‘फिट’ बसतो, अशाला त्यांच्या पक्षाची उमेदवारी दिली जात नाही. जो पक्ष व चळवळीशी एकनिष्ठ तोच कम्युिनस्ट पक्षाचा उमेदवार असतो. पक्षासाठी निष्ठने कार्य केलेल्या व पक्षसंघटेनासाठी वर्षानूवर्ष कार्य असलेल्या कार्यकर्त्यालाच संधी मिळते.
असा आहे ‘रेड कॉिरडोर’
मोर्शी तालुक्यातील आर्वी मार्गाने तिवस्यापर्यंत विस्तारलेली गावे आणि तेथून पुढे चांदूररेल्वेमार्गे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात प्रवेशलेली गावे, हा अमरावती जिल्ह्याचा ‘रेड कॉिरडोर’ आहे. नेरपिंगळाई, वऱ्हा-कुऱ्हा, अंजनसिंगी, फुबगाव, शिवणी रसुलापूर, येनस, मंगरुळचव्हाळा हा लालभाईंचा बालेिकल्ला आहे.

दोन ठिकाणी होते आमदार
अचलपूर आणि तिवसा या दोन मतदारसंघातून भाकपने यापूर्वी प्रतिनिधित्व केले आहे.तिवसा येथून भाई मंगळे यांना विजय प्राप्त झाला होता. तर व्ही.पी. िसंग पंतप्रधान असताना अमरावतीचे खासदार असलेल्या भाई सुदाम काका देशमुख यांनी त्यापूर्वी अचलपूर निधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.
उमेदवार निवडीची प्रक्रिया लवकरच
२४ आॅगस्टला नागपुरात विदर्भातील जिल्ह्यांची बैठक झाली. पक्षाच्या एकूण िस्थतीवर चर्चा झाली. माकपने विदर्भात लढण्याचे ठरवले आहे. सध्या राज्य पातळीवर समविचारी पक्षांच्या बैठकी सुरु आहे. त्यातून काय निर्णय बाहेर पडतो, ते कळल्यावर मतदारसंघ व उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यानंतर निर्णय अंतिम होईल.
सुभाष पांडे, अमरावती, जिल्हासचिव, माकप.