आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटात आता कम्युनिटी रेडिओ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सातपुडापर्वत रांगांमध्ये वसलेल्या मेळघाटात संपर्क मोठी समस्या आहे. सुमारे तीनशेवर गावांमध्ये संपर्क साधायचा कसा, हा प्रश्न प्रशासकीय यंत्रणेला पडतो. पोलिस आणि वन विभागाच्या बिनतारी संदेश यंत्रणा आहेत. परंतु त्यांनाही मर्यादा पडतात. त्यामुळे लवकरच मेळघाटात घरोघरी संपर्क साधण्यासाठी मोफत कम्युनिटी रेडिओ सेवा सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मेळघाटातील अनेक गावे दुर्गम अति दुर्गम आहेत. त्यामुळे तेथे सहजपणे दळवळण उपलब्ध नाही. वाहने जाऊ शकत नाहीत. मोबाइल सेवादेखील मोजक्याच ठिकाणी आहे. त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी नागरिकांशी संपर्क साधायचा कसा, हा मोठा प्रश्न प्रशासकीय यंत्रणेला पडतो. गावात दवंडी पिटायची असली तरी कमी वेळात ते शक्य होत नाही. त्यामुळे या समस्येवर कम्युनिटी रेडिओचा तोडगा काढण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन ही कम्युनिटी रेडिओ सेवा कार्यान्वित करणार आहे. त्यानंतर प्रत्येक गावात रेडिओ पोचवण्यात येतील. आपत्कालीन प्रसंगी महसूल यंत्रणा, पोलिस अथवा वन विभाग रेडिओवरून संदेश देईल. हे संदेश प्रत्येक गावात ऐकवण्याची व्यवस्था असेल.

रेडिओ वरून संदेश गेल्याने सरकारी योजनांची माहिती, सेवांबद्दलची माहिती, महत्त्वाचे अर्ज करण्यासाठी असलेल्या तारखांची माहिती मेळघाटातील आदिवासी नागरिकांपर्यंत पोचेल असा विश्वास गित्ते यांनी व्यक्त केला. ही रेडियो सेवा अगदीच रटाळवाणी होणार नाही ती सतत ऐकली जावी यासाठी काही प्रमाणावर मनोरंजनात्मक कार्यक्रमांची आखणी देखील करण्याचा विचार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

संपर्कावर भर
मेळघाटदुर्गम भाग असल्याने तेथे संपर्कावर भर आहे. त्यासाठी लवकरच ही सेवा सुरू करण्यावर भर आहे. किरणगित्ते, जिल्हाधिकारी.