आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडनेरात दोन समुदायांत तणाव; बाजारपेठ बंद, चौघांना केली अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- बडनेरा येथे शुक्रवारी सायंकाळी एका समुदायाच्या चार युवकांनी एका व्यापार्‍याच्या दुकानात जाऊन शिवीगाळ करून धमकी दिली.यामुळे संतप्त व्यापार्‍यांनी आपापली दुकाने बंद करून घटनेचा निषेध व्यक्त केला. त्या चार युवकांविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल केली. या प्रकरणाच्या निषेधार्थ शनिवारीही बडनेरात बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. चार दिवसांपूर्वी एका समुदायातील युवकाचा व्यापार्‍याच्या समुदायातील लोकांसोबत वाद झाला होता. तेव्हापासून या दोन समुदायांमध्ये संताप धगधगत होता. शुक्रवारी रात्री युवकांनी व्यापार्‍याला शिवीगाळ केल्यामुळे वातावरण आणखी चिघळले. पोलिसांनी शुक्रवारी चौघांविरुद्ध शिवीगाळ व दुकानात अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. शनिवारी त्यांना अटक करण्यात आली आहे. तत्पूर्वी शनिवारी सकाळपासूनच बडनेरात व्यापार्‍यांनी बाजारपेठ बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त केला. मात्र, पोलिस प्रशासन व समाजनेत्यांच्या प्रयत्नांमुळे शनिवारी सायंकाळी वातावरण निवळले होते.
संजय बंड यांच्या नेतृत्वात निवेदन
या घटनेप्रकरणी व्यापार्‍यांच्या समुदायाने शनिवारी माजी आमदार संजय बंड यांच्या नेतृत्वात पोलिस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांना निवेदन दिले आहे. बडनेरात शहरात अशांतता पसरवणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.