आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिखलद-यात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅटवर स्पर्धा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - चिखलदरायेथील पोलिस परेड ग्राउंडवर गिरीजन शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या यजमानपदाखाली अन् संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे आयोजित आंतर महाविद्यालयीन पुरुष महिला कुस्ती स्पर्धेचा गुरुवारी (दि.११) सकाळी ११ वाजता थाटात शुभारंभ झाला.

चिखलद-याचे माजी नगरसेवक मनोज शर्मा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल निम्बेकर होते. याप्रसंगी नगरसेवक अरुण तायडे, प्राचार्य राजेशजयपूरकर, इब्बू शहा, निवड समिती अध्यक्ष प्रा. देवानंद म्हाला, प्रा.संजय तीरथकर, प्रा. गुढे दत्तराव, भारत मुंडे डॉ. जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनोज तायडे यांनी तर संचालन प्रा. नंदकिशोर चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. श्रीकांत आगाशे यांनी केले. ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत होणा-या स्पर्धेचापुरस्कारवितरण समारंभ १३ डिसेंबर रोजी दुपारी वाजता होणार आहे. स्पर्धेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. सारंग परदेशी, प्रा. जितेंद्र राजपुत, प्रा. तायडे, प्रा.चव्हाण, प्रा. बक्षी, प्रा. आगाशे जितेंद्र भुयार हे या स्पर्धेतील पंच आहेत.

विजयी पहिलवान : पुरुषांच्या५७ किलो वजन गटात एम.एम.महाविद्यालय शेगावच्या गणेश सुरडकरने जी.टी.आय. महाविद्यालय दिग्रसच्या पहेलवानाला चित करून दुसरीफेरी गाठली. यासोबतच गचिखलद-याचा मल्ल इरफान खान, फुलसिंग पवार महाविद्यालय, पुसदचा नितीन चव्हाण यांनीहीविजय साकारला. ६१ किलो वजन गटातबाजारच्याविशाल चोरपगार संग्रामपूरच्या शेख सत्तारनेही दुसरी फेरी गाठली.