आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसा अभावी वाढली पुन्हा बळीराजाची चिंता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्ह्यातसध्या पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या झालेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे कोरडवाहू पट्ट्यात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या आहेत. दरम्यान, सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीनंतर सिंचनही सुरू केले आहे.
वाढत्या तापमानामुळे अंकुरलेल्या पिकांनी आतापासूनच मान टाकण्यास सुरवात केली आहे.
जिल्ह्यात मागील आठवड्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले होते. परंतु सातत्याने तुफान पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे जिल्ह्यात केवळ १९ टक्के पेरण्या झाल्या. १४ १५ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर काही शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या.
परंतु त्यानंतर मागील आठवड्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे बियाणे दडपल्याने या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. त्यानंतर सध्या पावसाने दडी मारल्यामुळे या पेरण्या अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली असून कोरडवाहू पट्ट्यात शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या आहेत. पेरण्या झाल्यानंतर सध्या बियाणे अंकुरण्यास सुरुवात झाली आहे. परंतु वाढत्या तापमानामुळे बियाणांचे अंकुर कोमेजण्याचा धोका निर्माण झाला आहे.

जमिनीत ओल समाधानकारक असूनही वातावरणातील वाढत्या तापमानामुळे बहुतांश झालेल्या पेरण्या अडचणीत येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू असून त्यावर शेतकऱ्यांनी सिंचनही सुरू केल्याचे चित्र बागायत पट्ट्यात दिसून येत आहे.

मागील वर्षीही बसला जबर फटका
मागीलवर्षीही सुरवातीला पाऊस येऊन त्यानंतर पावसाने दडी मारल्याने गंभीर स्थिती उद् भवली होती. तब्बल दिड महिना पेरण्या उशीरा झाल्याने उत्पादनात कमालीची घट येऊन शेतकऱ्यांना जबर फटका बसला होता. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले होते. पुढील आठवडाभर पाऊस आल्यास कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांना यावर्षी जबर नुकसान सहन करावे लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पेरणी झालेले क्षेत्र १,२५,००४ हे.
पेरणीयोग्य एकूण क्षेत्र ७,१४,९५० हे.
१९% पेरण्याआटोपल्या
०९%कपाशी
०७%सोयाबीन
०२%तूर

सोयाबीन, कडधान्य संकटात
जिल्ह्यातसध्यापर्यंत सर्वाधिक कपाशीचा पेरा झाला असून त्या खालोखाल सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. जमीनीत असलेल्या ओलाव्यामुळे दोन पाने झालेले कपाशीचे पीक किमान पंधरा ते वीस दिवस टिकाव धरू शकते. परंतु वाढत्या तापमानामुळे सोयाबीन इतर कडधान्य अडचणीत येऊ शकतात. आठवडाभर पाऊस आल्यास याचा सर्वाधिक फटका सोयाबीन कडधान्यांना बसण्याची शक्यता आहे.

दुबार पेरणीचे संकट
मीबारा एकरात तूर सोयाबीनची तर तीन एकरात कपाशीची पेरणी केली. आतापर्यंत अंदाजे किमान दोन लाख रुपये खर्च आला. बियाणांचे कोंब जमिनीबाहेर येताच कडक उन्हामुळे सुकत आहे. पाच सहा दिवस पाऊस आल्यास दुबार पेरणीचे महासंकट उभे राहू शकते. चेतनठाकरे, शेतकरी, टाकरखेडा शंभू,. अंजनगावसुर्जी
बातम्या आणखी आहेत...