आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकू घेऊन नाचणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्याला अटक व सुटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- नेहरू मैदानात शुक्रवारी (दि. 31) युवक काँग्रेसच्या जल्लोषात हाती चाकू घेऊन नाचणारा युवक हा काँग्रेसचाच कार्यकर्ता असल्याचे शहर कोतवाली पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नीलेश गुहे हे त्या युवकाचे नाव आहे.

पोलिस आयुक्त अजित पाटील यांच्या आदेशावरून शहर कोतवाली पोलिसांनी शनिवारी सकाळीच नीलेशला शस्त्र कायद्यांतर्गत अटक केली. रीतसर गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. हातात चाकू घेऊन नाचणे, काँग्रेसच्याच दोन गटांमध्ये विजयोत्सवादरम्यान झालेला वाद यामुळे युवक काँग्रेसच्या निवडणुकीला गालबोट लागले होते.
हाती चाकू घेऊन नाचणारा तरुण आणि धिंगाणा घालणारे लोक काँग्रेस कार्यकर्ते असूच शकत नाहीत,

असा दावा जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला होता. इतकेच नव्हे, तर भाजप-शिवसेनेतील काही घुसखोरांनी हे कृत्य केल्याचेही त्यांनी नमूद केले होते. शहर कोतवाली पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर धिंगाणा घालणारा तरुण काँग्रेस कार्यकर्ताच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी शनिवारी संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्यानंतर कॉँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर संबंधितांवर पक्ष आता काय कारवाई करणार, याकडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.