आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती काँग्रेसमध्ये धुसफूस सुरूच; नगरसेविका न्यायालयात जाण्याच्या तयारीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- महापालिकेच्या कर्मचार्‍याला महापौरांनी त्यांच्या अधिकारात प्लॉट दिल्याचा मुद्दा आता काँग्रेसमध्ये चांगलाच तापला आहे. नगरसेविका अर्चना इंगोले यांनी या विषयात मनपात न्याय मिळाला नाही, तर कोर्टात जाण्याची तयारी चालवल्याने भविष्यात हा वाद अधिकच चिघळण्याचे संकेत आहेत. महापौर व आयुक्तांना या प्रकरणात ‘पार्टी’ करण्याची तयारी सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे ज्या भागात या कर्मचार्‍याला प्लॉट मंजूर करण्यात आला, त्या सव्र्हे नंबरमध्ये आधीच मनपाच्या तीन कर्मचार्‍यांना प्लॉट मंजूर आहेत, एकाला तो देण्यात आला व दोघांची प्रक्रिया सुरू आहे. एका सव्र्हे नंबरमध्ये तीनच प्लॉट देण्याची र्मयादा असताना हा चौथा प्लॉट कसा देण्यात आला, हा अर्चना इंगोले यांचा प्रश्न आहे. त्यातच हा प्लॉट अतिशय कमी किमतीत देण्यात आल्याने 24 लाखांचे नुकसान झाले आहे..

नगरसेविकेविरुद्ध ‘एल्गार’
नगरसेविका डॉ. दिव्या सिसोदे यांचे वागणे जिव्हारी लागल्याने राममोहन नगरातील नागरिकांनी त्यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. विकासाबाबत समस्या घेऊन गेलो असता अपशब्द वापरल्याचा आणि विकासकामांबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.

घरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी 20 वर्षांपासून नालीसाठी राममोहन नगरवासीयांना संघर्ष करावा लागत आहे. चार कॉलन्या मिळून झालेल्या परिसरात एका घराच्या बाजूला सांडपाण्याची नाली आहे, तर पुढील ओळीला ती सुविधा नाही. 1993 पासून येथे राहत असलेल्या नागरिकांना 20 वर्षांनंतर सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाली, योग्य चालता यावे म्हणून पक्का रस्ता, अंधारात घराबाहेर पडता यावे म्हणून विजेचे दिवे आदी प्राथमिक सुविधा मागण्याची वेळ आली आहे. नगरसेविकेने नकार दिल्याने नागरिकांना महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांच्याकडे प्राथमिक सुविधांची कामे व्हावीत, अशी गळ घालावी लागली. आयुक्तांना निवेदन देतेवेळी सुरेश तेलखडे, जयवंत पराते, अरुण बानोकर, वसंत वांगे, शालिनी वाडीघरे, विजय गिरासे, विजय तिरपुडे, चंद्रशेखर चव्हाण, गजानन इंगळे, अनिल पाटील, रवींद्र धुमाळे, गोरक्षनाथ पुरी, जागृत नगराळे, चरणदास अघम, नंदा वांगे, संगीता देवतारे, ममता पुरी, अर्चना नगराळे, बेबी अघम, सुषमा गिरासे, दुर्गा तिरपुडे उपस्थित होते.