आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसने राखला गड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सतीश उईके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पडद्यामागे नाट्यमय घडामोडी होऊन रविवारी (दि. २१) अध्यक्षपदी काँग्रेसचे सतीश उईके यांची, तर उपाध्यक्षपदी अपक्ष सदस्य सतीश हाडोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्षपदाच्या या निवडणुकीतही खोडके गटाच्या मानले जाणा-या राकाँच्या चार सदस्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात असल्यामुळे व-हाड विचार मंचने जिल्हा परिषदेतही आपले अस्तित्व दाखवून दिले. दरम्यान, भाजप, शिवसेना प्रहारचे सदस्य निवडणुकीला गैरहजर राहिले.
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे डोळे लागले होते. या वेळी अध्यक्षपद अनुसूचित जमाती, तर उपाध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव होते. अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेला सकाळी अकरा वाजतापासून सुरुवात करण्यात आली होती. मागील वेळी राकाँच्या सुरेखा ठाकरे यांनी केवळ सात सदस्य असताना भाजप, शिवसेना, प्रहार आदी घटक पक्षांचा पाठिंबा मिळवून अध्यक्षपदाची माळ गळ्यात पाडून घेतली होती. उपाध्यक्षपदी भाजपचे जयप्रकाश पटेल यांची निवड करण्यात आली होती. काँग्रेसचे २५ सदस्यांचे प्राबल्य असूनही राकाँने सोयीचे राजकारण करून अध्यक्ष-उपाध्यक्षपदावर ताबा मिळवला होता. अध्यक्ष-उपाध्यक्षपदांची मुदत २० सप्टेंबर रोजी संपल्याने रविवारी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीतही राकाँ काँग्रेसला सहकार्य करणार की नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती.
दरम्यान, मागील विविध पक्षांची युतीच कायम राहील, अशीही शक्यता व्यक्त होत होती; परंतु राकाँने संजय खोडके यांना पक्षातून निष्कासित केल्यानंतर खोडके यांनी थेट शक्तिप्रदर्शन केले होते. याचा परिणाम नुकत्याच झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत दिसून आला. खोडके यांना निष्‍कानीत केल्यानंतर जिल्हा परिषदेतील राकाँचे चार सदस्य खोडके समर्थित मानले जात होते. काँग्रेसच्या सत्तास्थापनेमध्ये या चार सदस्यांचीच भूमिका मोलाची मानली जात आहे. दरम्यान, काँग्रेसला जनसंग्रामचे दोन अपक्ष एक सदस्याचाही पािठंबा िमळाला होता. त्यामुळे काँग्रेसच्या बाजूने ३२ सदस्यांचे संख्याबळ झाले असल्याचे काँग्रेसचे गटनेते बबलू देशमुख यांनी सांगितले. यामुळे काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला होता. बसपाचे रवि मुंदे रिपाइंचे प्रताप अभ्यंकर यांचीही सभागृहात उपस्थिती होती.