आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Minister Kamalnath Rally At Amravati For Maharashtra Polls 2014

दिल्लीपेक्षा गल्लीच्या विकासाला प्राधान्य द्या- कमलनाथ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- देशात कुणाची सत्ता आहे? राज्यात कुणाची सत्ता येईल, याचा विचार करत बसण्यापेक्षा मतदारांनी दिल्लीपेक्षा गल्लीला प्राधान्य देऊन शहराचा, गावाचा, खेड्यांचा विकास करणाऱ्या समक्ष उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन काँग्रेस ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी रविवारी (दि. १२) केले.
नांदगावपेठ येथे काँग्रेसच्या उमेदवार अॅड. यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. आपल्या वीस मिनिटांच्या भाषणात कमलनाथ यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्याच्या मुद्द्यांना फारसा हात घातला थेट जिल्ह्याच्या विकासाबद्दल बोलणे पसंत केले.

नांदगावपेठ परिसरात पंचतारांकित एमआयडीसी काँग्रेसच्याच राजवटीत आल्याचा उल्लेख त्यांनी केला. काँग्रेस सरकारच्या काळात राज्यात खरोखरच विकासाची कामे झालीत. अनेक धाडसी निर्णयही काँग्रेसनेच घेतले. त्यामुळे दिल्लीतील सत्तेच्या आहारी जाता तुमच्या गल्लीतील विकासकामे करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, असे नाथ म्हणाले. काँग्रेसने प्रादेशिक भेद करता महाराष्ट्र असो, की विदर्भ प्रत्येकच परिसराच्या विकासावर भर दिला आहे. जवळूनच जाणारा चौपदरी हायवे त्याची साक्ष देत आहे.

नागपूर, वर्धा, मध्य प्रदेश आणि आता अमरावती अशा अनेक ठिकाणी आपण फिरलो. मात्र, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांच्या विकासात काय फरक आहे, हे आपल्याला लगेचच कळून आले, असे नाथ यांनी नमूद केले. विदर्भातही अमरावती जिल्हा विकासाच्या बाबतीत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुढेच आहे, त्याला असेच पुढे ठेवा, असे आवाहन नाथ यांनी केले.

आपल्या भाषणात अॅड. यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस सरकारच्या मदतीने तिवसा मतदारसंघातील गावागावांत विकासकामे केली.विकासकामांबाबत विरोधकांना बोलण्यास जागा नसल्याने ते आपल्यावर चुकीचे आरोप करीत आहेत. मात्र, याची आपल्याला तमा नसून, जनतेच्या प्रेमाखातर पुन्हा ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.

यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ नांदगावपेठ येथे आयोजित जाहीर सभेला मतदारसंघातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

ग्रामगीता ग्रंथ दिला भेट राष्ट्रसंततुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ यांना यशोमती ठाकूर यांनी ग्रामगीता हा ग्रंथ भेट दिला. संपूर्ण देशवासीयांना बंधुभावाची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंतांच्या भूमीत येऊन गेल्याची आठवण सदैव होत रहावी, यासाठी हा अनमोल ग्रंथ भेट म्हणून देत असल्याचे अॅड. यशोमती ठाकूर यांनी या वेळी सांगितले.