आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेतील आघाडी तळ्यात-मळ्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - जिल्हापरिषदेत काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने सोबत बसायचे ठरवले. पंचायत समितीच्या निवडणुकीत मात्र काही ठिकाणी बिघाडी झाल्याने आता जिल्हा परिषदेमधील आघाडी पुन्हा तुटण्याच्या मार्गावर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप बाजोरिया यांनी तर काँग्रेसला फक्त काही अटींवर उपाध्यक्ष पद देऊ आणि सभापतिपदांचे नंतर बघू, असे उत्तर देऊन ‘जशाच तसे’चा प्रयत्न केला आहे. एकंदरीत काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांची वक्तव्ये बघता जिल्हा परिषदेतील आघाडीत पुन्हा बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेत काँग्रेसचे २२, राष्ट्रवादी काँग्रेसचे २१, शिवसेना- १३, भाजप- ४, मनसे- १, अपक्ष- असे एकूण ६२ सदस्य आहेत. अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसोबत युती करून काँग्रेसला विरोधी बाकावर बसवले होते. आता विधानसभेच्या तोंडावर वरिष्ठांचे आदेश आल्याने पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेत या दोन्ही पक्षांनी आघाडी केली. रविवारी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत काही ठिकाणी मात्र आघाडीत बिघाडी झाली आणि पुन्हा या दोन पक्षांत ताटातूट सुरू झाली आहे.
पंचायत समितीमधील निवडणुकीत झालेल्या बेबनावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काँग्रेसवर संतापले आहेत. त्यांनी तर जिल्हा परिषदमधील आघाडीबद्दल आता संकोच व्यक्त केल्याने नेमकी आघाडी होते की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
आघाडीचा निर्णय सर्वांचा
काँग्रेसच्यासदस्यांना सभापतिपद मिळावे म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत जिल्हा परिषदेत आघाडी करण्याचा निर्णय घेतला. आमच्या जागा जास्त असल्या, तरी अध्यक्षपद राष्ट्रवादीला जाणार आहे. आम्ही मवाळ धोरण अवलंबत आहोत. आम्ही जिल्हा परिषदेत अडीच वर्षे सत्तेबाहेर होतो; आता त्यानिमित्ताने सत्तेत राहण्याची संधी िमळणार आहे. शिवाजीरावमोघे, काँग्रेसनेते तथा पालकमंत्री.
अटींवर उपाध्यक्ष पद देऊ
काँग्रेसचेबाळासाहेब मांगुळकर यांना आम्ही उपाध्यक्षपद द्यायला तयार आहोत. एकट्या बाळासाहेब मांगुळकर यांनी पंचायत समितीमध्ये प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांचा अपवाद वगळता इतरांना आम्ही उपाध्यक्षपद द्यायला अिजबात तयार नाही. सभापतिपद द्यायचे की नाही, हेसुद्धा आम्ही ठरवलेले नाही. संदीपबाजोरिया, आमदार,राष्ट्रवादी काँग्रेस

अध्यक्षांचा संताप
कळंबपंचायत समितीमध्ये काँग्रेस आमदार वसंत पुरके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातावर तुरी दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छेविरुद्ध स्वत:चा सभापती बनवला. या घटनेमुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राळेगाव मतदार संघातले नेते प्रवीण देशमुख संतापले आहेत. काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभर आघाडी राहिली तरी राळेगावात राहणार नाही. आम्ही आता काय करायचे ते बघू, अशा शब्दांत त्यांनी पुरके सरांना इशाराच देऊन टाकला आहे.