आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्‍हा काँग्रेसच्या आंदोलनाला आमदारांनीच मारली दांडी, ‘रास्ता रोको’ झालाच नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - केंद्रसरकार विरोधात काँग्रेसने घोषित केलेल्या तीन दिवसीय आंदोलनाच्या श्रुंखलेतील दुसऱ्या दिवशी जिल्‍हा काँग्रेस कमिटीने केलेले आंदोलनही प्रभावहीन ठरले. यात जिल्‍ह्यातील काँग्रेसच्या दोनपैकी एकाही आमदाराने सहभाग घेतला नाही. पहिल्या दिवशी शहर काँॅग्रेस कमिटीने जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलन ऐनवेळी रद्द करून अवघ्या ४० कार्यकर्ते जिल्‍हाधिकाऱ्यांना िनवेदन सोपवून िनघून गेले होते. याचीच पुनरावृत्ती शुक्रवारी जिल्‍हा ग्रामीण शाखेने केली.

काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उपाख्य बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात शुक्रवारचे आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष संजय अकर्ते यांनी २३ जानेवारीला काँग्रेसच्या वतीने ‘रास्ता रोको’ केला जाईल, असे संकेत दिले होते. मात्र, तसे कोणतेही आंदोलन जिल्ह्यात झाले नाही. ग्रामीण काँग्रेसच्या सुमारे शंभर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके यांच्या शासकीय निवासस्थानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी किरण गित्ते हे चिखलदरा पर्यटन महोत्सवासाठी गेले होते. त्यामुळे अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर कामुने यांनी हे निवेदन स्वीकारले. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती सरिता मकेश्वर, गिरीश कराळे, महापौर रीना नंदा, स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल, काँग्रेसचे सरचिटणीस संजय खोडके, सुलभा खोडके, नरेश ठाकरे, भय्यासाहेब मेटकर, प्रकाश काळबांडे, यशवंत मंगरोळे, सुरेश पडोळे, श्रीपाल पाल, किशाेर शेळके, रश्मी नावंदर, नाजुकराव मोहोड, जुम्मा हसन नंदावाले, गणेश आरेकर, संजय मापले, मुन्ना नवाब, प्रल्हाद ठाकरे, अनिकेत देशमुख, शिवराज मोरे आदी उपस्थित होते. दरम्यान, आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांचा फोन संपर्क कक्षेबाहेर होता.

आमदार कामात व्यस्त असावेत
-मतदारसंघातीललोकांच्या कामात व्यस्त असल्याने काँग्रेसचे आमदार आंदोलनात येऊ शकले नसतील . परंतु त्याचा अर्थ ते अलिप्त आहेत, असे नाही. सामान्यांच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत. अनिरुद्धउपाख्य, बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष काँग्रेस
मी राजस्थानात
-मीसंध्या कामानिमित्त राजस्थानात आहे. आंदोलनातील सहभागासंबंधी प्रतिक्रिया देण्यास बांधील नाही. प्रा.वीरेंद्र जगताप, आमदार, धामणगाव रेल्वे.

आमदारांची उणीव
काँग्रेसच्याआंदोलनाला जिल्‍ह्यातील आमदारांनी दांडी मारली. धामणगाव रेल्वेचे आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, तिवसाच्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांची अनुपस्थिती जाणवत होती. इतकेच नव्हे, तर माजी आमदार केवलराम काळे, रावसाहेब शेखावत हेसुद्धा दिसले नाहीत.