आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस पक्षाच्या रास्ता रोको आंदोलनाचा उपराजधानीत फज्जा, कार्यकर्त्यांची अत्यल्प उपस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- केंद्रराज्य सरकारविरुद्ध आंदोलनाची घोषणा करणाऱ्या काँग्रेसच्या राज्यस्तरीय रास्ता रोको आंदोलनाला नागपुरात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांसह अनेक बड्या नेत्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसह इतर प्रश्नांवर केंद्र राज्य सरकारविरुद्ध काँग्रेसने सोमवारी फेब्रुवारीला राज्यस्तरीय रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन केले. यासाठी नेत्यांची नियुक्तीही केली. व्हरायटी चौकात गांधी पुतळ्याजवळ माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वातील रास्ता रोको आंदोलनास शंभर ते सव्वाशे कार्यकर्ते उपस्थित होते. माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यासह अनेक बडे नेते या आंदोलनाकडे फिरकलेही नाही. हे दोन्ही नेते नागपुरात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्या तुलनेत राष्ट्रवादीच्या वतीने मागील आठवड्यातील आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. हजार ते दीड हजार कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून केंद्र राज्य शासनाचा निषेध नोंदवला होता.

नागपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र, राज्य सरकारच्या विरुद्ध सोमवारी सिताबर्डी येथे रास्ता रोको आंदोलन केले. शहर काँग्रेस अध्यक्ष् विकास ठाकरे , माजी मंत्री नितीन राऊत , शेख हुसेन , बंटी शेळके, महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनानंतर कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.