आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress Pick Bikhare Moti, Two Days Conclave In Melghat

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस वेचणार ‘बिखरे मोती’! मेळघाटात दाेन दिवस मेळावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पक्षाशी बांधिलकी असलेले, मात्र काही कारणांमुळे पक्षकार्यापासून अलिप्त झालेल्या राज्यातील प्रभावशाली कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी काँग्रेसने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातील अशा बलशाली १३० खंद्या कार्यकर्त्यांचा शोध काँग्रेसने घेतला आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील या १३० कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या व्यासपीठावर एकत्रित आणून त्यांच्यावर पुन्हा एकदा पक्षकार्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

राज्यातील महत्त्वपूर्ण अशा १३० कार्यकर्त्यांच्या एकत्रीकरणाचा प्रयोग करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटाची निवड काँग्रेसने केली आहे. मेळघाटातील चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणी या प्रमुख कार्यकर्त्यांचे दोनदिवसीय शिबिर येत्या शनिवारी आणि रविवारी (दि. ६ व ७ जून) आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. काँग्रेसने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे ‘बिखरे मोती’ असे नामकरण करण्यात आले आहे.
काँग्रेसचे हिंगाेलीतील खासदार राजीव सातव, उत्तराखंडचे वरिष्ठ काँग्रेसी प्रकाश जोशी, शरद अहिर यांच्यासह काँग्रेसचे काही प्रमुख पदाधिकारी या शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी काँग्रेस सरसावली आहे. लोकसभेच्या पराभवानंतर विखुरलेल्या बलशाली कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याकरिता काँग्रेसने हा प्रयत्न चालवला आहे. ही सर्व मंडळी काँग्रेसच्या विचाराशी सुसंगत आहेत, मात्र सध्या पक्षापासून दूर गेली आहे.

काय अाहे ‘बिखरे मोती’ संकल्पना ?
मुळात काँग्रेसी विचाराचे असलेले हे सर्व कार्यकर्ते सध्या काँग्रेस पक्षापासून दुरावलेले आहेत. काँग्रेसची राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना या कार्यकर्त्यांवर वेळोवेळी अन्याय झाल्याने त्यांना काँग्रेसच्या काळात सत्तेतही वाटा मिळाला नाही. लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसने पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी काही निवडक कार्यकर्त्यांवर सोपवली होती. या प्रक्रियेतून ‘बिखरे मोती’ ही संकल्पना आली आहे.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात प्रयोग : चिखलदरा येथे गोपनीयरीत्या या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. याकरिता एका खासगी हॉटेलचे बुकिंग करण्यात आले आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या महत्त्वाच्या पदाधिका-यांनाही या कार्यक्रमाची कल्पना देण्यात आलेली नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी ‘बिखरे मोती’ ही संकल्पना मांडली होती. राज्यातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या ठिकाणी बिखरे मोतीचे प्रयोग झाले आहेत.