आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानगरीमध्ये एसटीचे नवे कॉर्पोरेट बसस्थानक

7 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
अमरावती - ‘प्रवाशांच्यासेवेसाठी’ या घोषवाक्यासह जनसामान्यांसाठी ‘गाव तेथे रस्ता,’ ‘रस्ता तेथे एसटी’ अशी सुविधा देणारे महामंडळ अधिक हायटेक करण्यासाठी बस स्थानकांचे सुसज्जीकरण (कॉर्पोरेट बसस्थानक), आकर्षक बस तथा जीपीएस प्रणालीसह ई-गव्हर्नन्स सुविधा प्रवाशांना पुरवण्यात येत आहे. त्यासाठी ४० वर्षे झालेल्या बसस्थानकांची नव्याने उभारणी करण्यासाठी राज्यातील बसस्थानकांची बीआेटी तत्त्वावर सुसज्ज इमारत बांधण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमरावती बस स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी राजापेठ चौकात बीआेटी तत्त्वावर अद्ययावत व्यापारी संकुलासह सुशोभीत सुसज्ज बसस्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे.

व्यापारी संकुल बस स्थानकाची इमारत तयार झाली आहे. येत्या दोन महिन्यांत हे नवीन स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सहा फलाटांच्या स्थानकासह ७४ गाळ्यांचे व्यापारी संकुल येथे उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांिगतले.

परिसरातपर्यावरण संतुलन राखले जाईल
अद्ययावतबसस्थानकाची उभारणी होत असताना व्यापारी संकुलासह बसस्थानकाची इमारत आकर्षक सुशोभीत करण्यात येईल. यासाठी पर्यावरण संतुलन राखण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. स्थानकात विद्युतीकरण, पाणीपुरवठा जलनिस्सारण व्यवस्थेसह मूलभूत सुविधा राहणार आहेत. पर्यावरण संतुलनाचा भाग लक्षात घेता हिरवळ वृक्षारोपणाद्वारे सुशोभीकरण केले जाईल.

महामंडळाची राहील मालकी
महामंडळाससुसज्ज बसस्थानकाचे बांधकाम विकसकाच्या खर्चाने (विनामूल्य) बांधून मिळणार आहे. त्यानंतर स्थानकाची पुढील देखभाल ३० वर्षांसाठी महामंडळाच्याच हाती राहील. ३० वर्षांकरिता भाडेस्वरूपात उत्पन्नही मिळणार आहे. बसस्थानक व्यापारी संकुलाची इमारत कायमस्वरूपी महामंडळाची मालकी असणार आहे.

व्यापारी संकुल भाडे करार
महामंडळाच्याक्षेत्रफळावरील जागेत व्यापारी संकुल असणार आहे. यात तळमजला पहिल्या मजल्यावर व्यापारी गाळे बांधण्यात येईल. क्षेत्रफळावरील जागेत जवळपास ७४ गाळे बांधण्यात येईल. हे गाळे ३० वर्षे भाडेकरार तत्त्वावर असतील. गाळ्यांसाठी स्वतंत्र, प्रसाधनगृह, भूमिगत पाणी टाकी, आेव्हर हेड पाण्याची टाकी यांसारख्या सुविधा असणार आहेत.

अमरावती बस डेपोची स्थापना १९६५ मध्ये झाली आहे. त्यामुळे सध्या तरी या स्थानकाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव नसल्याचे सूत्रांनी सांगितले. राजापेठ चौकात बीआेटी तत्त्वावर होऊ घातलेेले बस स्थानक येत्या दोन महिन्यांत सुरू होईल. या नवीन स्थानकावर सहा फलाट राहणार आहेत, याशिवाय अद्ययावत सुविधाही राहतील. मात्र, तेथून कुठल्या ठिकाणी गाडी सोडण्यात येईल, याचा निर्णय अद्याप झाला नाही. परंतु, मुख्य बस स्थानकावरील ताण बऱ्यापैकी कमी होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आलेे.
 • या असतील सुविधा
 • बसण्यासाठीस्टेनलेसस्टीलच्या खुर्चा
 • रेल्वेच्याधर्तीवरप्रतीक्षालय
 • नियंत्रणकक्ष
 • संगणकीयआरक्षण
 • स्थानकप्रमुखकक्ष
 • पार्सलरूम,क्लॉक रूम
 • चालक-वाहकविश्रांतीगृह
 • महिलावाहकांसाठीस्वतंत्र व्यवस्था
 • प्रवाशांकरिताप्रसाधनगृह
 • प्रवाशांसाठीलगेजठेवण्याची व्यवस्था
 • हिरकणीकक्ष
 • अधिकाऱ्यांसाठीिवश्रांतिगृह