आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोर आयुक्ताकडे बेहिशेबी घबाड, शेती, तीन फ्लॅट, तीन कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आदिवासी विकास विभागातील लाचखोर अपर आयुक्त भास्कर वाळिंबेकडे ज्ञात स्त्रोतांपेक्षा १७८ टक्के जास्तीची मालमत्ता उघड झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अाठ महिन्यांच्या तपासात वाळिंबेची रायगड व ठाणे जिल्ह्यात प्रत्येकी दोन ठिकाणी, तसेच रत्नागिरी जिल्ह्यात शेती आढळून आली. ठाण्यात तीन फ्लॅट व एक गाळा आहे. शिवाय होंडा, स्विफ्ट व ह्युंदाई कारसह दोन दुचाकी त्यांच्याकडे आहेत.या प्रकरणी वेगळा गुन्हा दाखल झाला आहे.
बीड, जालन्यातही सेवा
३१ वर्षांत वाळिंबे यांनी ठाणे, जालना, बीड, अमरावती, चिखलदरा, रत्नागिरीत काम केले. वनविभागात रुजू झालेले ते २०१३ पासून आदिवासी विभागात होते.

१२ लाखांची बाइक
वाळिंबेंच्या मुलाकडे १२ लाख रुपये किमतीची दुचाकी आहे. ती वाळिंबेंनी घेऊन दिलेली आहे की त्यांच्या मुलाने स्वत: घेतली, याची चौकशी होणार आहे.