आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकर्‍यांचा कापूस थेट कारखान्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शेतकर्‍यांच्या कापसास व्यापार्‍यांकडून मिळणार्‍या दरापेक्षा अधिक दरासाठी उत्तम दर्जाच्या कापसाचे उत्पादन आवश्यक आहे. गरजेच्या पूर्ततेसाठी ‘केम’ने (कृषी समृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्प) यंदापासून जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये शेतकर्‍यांसाठी हा प्रकल्प हाती घेतला आहे. बीसीआयच्या मार्गदश्रनानुसार कापसाची निगा राखल्यास शेतकर्‍यांना प्रकल्पाचा फायदा होईल.
दिल्ली येथील बीसीआय (बेटर कॉटन इनिशिएटिव्ह) ही यंत्रणा कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मार्गदश्रन करते. केमने शेतकर्‍यांना थेट या यंत्रणेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बीसीआयची चमू नुकतीच जिल्ह्यात येऊन गेली असून, सहा तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. बीसीआयच्या मार्गदश्रनानुसार लागवड केल्यास शेतकर्‍यांचा वेळ, पैसा, श्रम वाचण्यासोबतच उत्तम दर्जाच्या कापसाची उत्पादन होणार आहे. या प्रकल्पांतर्गत उत्पादित कापूस जिनिंगमध्ये प्रक्रिया करून गाठींच्या (बेल) स्वरूपात थेट कारखान्यांना पाठवण्यात येणार आहे. परिणामी, बाजाराच्या तुलनेत शेतकर्‍यांना अधिक दर मिळणार, अशी माहिती ‘केम’चे कृषी व्यवसाय तज्ज्ञ किशोर मिरजकर यांनी दिली. कापसाला र्मयादित पाण्याची गरज असल्याने जमिनीचे आरोग्य सांभाळण्यासाठी आवश्यक तेवढेच रासायनिक घटक खताद्वारे द्यावेत, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
तालुका स्तरावर जिनिंग प्रक्रिया
प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार असून मोश्री, वरुड, अंजनगावसुर्जी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर आणि अचलपूर तालुक्यांतील शेतकर्‍यांचा समावेश आहे. प्रत्येक गावातील 35 शेतकर्‍यांना गट केला आहे. बीसीआयच्या मार्गदश्रनानुसार पिकवलेल्या कापसावर स्थानिक स्तरावरच प्रक्रिया करणे आवश्यक असल्यामुळे तालुक्याच्या जागी जिनिंगची आहे. त्यांच्याशी बोलणी सुरू असून कोणत्याही कारखान्यास कापूस देतेवेळी तो गाठीस्वरूपात देणे गरजेचे असल्याचे ‘केम’चे कृषी व्यवसाय तज्ज्ञ किशोर मिरजकर यांनी सांगितले.