आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cotton Market: Prices Extend Gains Amid Selective Buying

4700 रुपये भावाने कापूस खरेदीला सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - कृषिउत्पन्न बाजार समितीच्या यार्डवर कापसाच्या खासगी खरेदीला शनिवारी चार हजार 700 रुपये प्रतिक्विंटल भावाने सुरुवात करण्यात आली.

नवलकिशोर मालपाणी यांच्या अडतीला कापूस घेऊन आलेले खानापूर येथील कास्तकार रावसाहेब ढोके यांच्या गाडीचे प्रारंभी पूजन करण्यात आले. या वेळी शाल-श्रीफळ देऊन ढोके व खरेदीदार सुनील साबू यांचा सत्कार करण्यात आला. बाजार समितीचे प्रशासक नानासाहेब चव्हाण यांच्या उपस्थितीत कापसाच्या खरेदीला प्रारंभ झाला. लांब धाग्यासाठी असलेल्या 4700 रुपये हमीभावाने कापसाची खरेदी साबू यांनी केली.

बाजार समितीच्या आवारात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात बाजार समिती सचिव दीपक विजयकर, सहायक सचिव बी. एल. डोईफोडे, निरीक्षक राजेश इंगोले, प्रकाश वसू, राजू पमनानी, आनंद पनपालिया, अरुण पटेरिया, अनुप राठी, सुनील साबू, इब्राहिमभाई, आसिफ मंसुरी, विजय साहू, विशाल भट्टड, प्रशांत कडू, नरेश साहू, अमोल कडू, साहेबराव ठाकरे, हरगोविंद कलंत्री, अर्जुन डेहणकर, दिलीप नारंगे यांच्यासह बाजार समितीचे अडते, खरेदीदार, कास्तकार व समितीचे कर्मचारी उपस्थित होते.