आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पणन’च्या कापूस खरेदीस शेतकऱ्यांचा ‘नो रिस्पॉन्स’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पणनमहासंघाचे जिल्‍ह्यात शनिवारपासून (दि. १५) दोन खरेदी केंद्रे सुरू झाली. मात्र, एकाही केंद्रावर काटा पूजनासाठीसुद्धा कापूस आला नाही. दुसरीकडे, जिल्‍ह्यात सुरू असलेल्या ‘सीसीआय’च्या तीन केंद्रांवर मागील १२ दिसांमध्ये तीन हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.

खासगी बाजारात यावर्षी क्विंटलमागे चार हजारांच्या आसपास भाव आहे. मात्र, उत्पादनखर्चाच्या तुलनेत तो नगण्य असून, यामधून शेतकरी कर्जबाजारी होण्याचीच शक्यता अधिक आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. पावसाच्या अनियमिततेमुळे यंदा खरीप हंगाम अगोदरच शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकं अगोदरच शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व आशा कापूस या नगदी पिकावर केंद्रित झाल्या होत्या. मात्र, तूर्तास भाववाढीची शक्यता नसल्याचे मत क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कॉटन फेडरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) ने नोव्हेंबरपासून कापूस खरेदी सुरू केली असून, जिल्‍ह्यात चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, तळेगाव दशासर येथे केंद्र खरेदी केंद्र सुरू झाली आहेत. येथून आतापर्यंत तीन हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ‘सीसीआय’सुद्धा शेतकऱ्यांना शासकीय दरानेच रक्कम देत आहे.

जिल्ह्यात तळेगाव दशासर, धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे, ही तीन कापूस खरेदी केंद्र आम्ही सुरू केली आहेत. शेतकऱ्यांना शासकीय दराने सात दिवसांच्या आत रक्कम देण्यात येते. विदर्भात २८ केंद्र सुरू केली असून, त्यांपैकी १८ सद्यस्थितीमध्ये सुरू झाली आहेत. एन.पी. लांजेवार, केंद्रप्रभारी, धामणगाव रेल्वे,
‘सीसीआय’ची ४० हजार क्विंटल खरेदी
‘सीसीआय’नेविदर्भात १८ खरेदी केंद्र सुरू केली असून, आणखी दहा केंद्र ते सुरू करणार आहेत. १८ केंद्रांवर आतापर्यंत ४० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाल्याचे ‘सीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले. अकोला बुलडाणा जिल्‍ह्यांतून सर्वाधिक २५ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.
‘सीसीआय’च्या तीन केंद्रांवर १२ दिवसांत ३,००० क्विंटल कापूस खरेदी