आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी अहंकारी पंतप्रधान, अतुलकुमार अंजान यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- देशाच्याकोणत्याच पंतप्रधानांनी या पूर्वी एवढा कधी प्रचार केला नाही, जेवढा सध्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करत आहेत. त्यांचे भाषण म्हणजे केवळ ‘डायलॉगबाजी’ आहे. एवढे अहंकारी प्रधानमंत्री पूर्वी कधीच झाले नव्हते, अशी टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य तथा अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सचिव अतुलकुमार अंजान यांनी केली आहे. शुक्रवारी अमरावतीतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मोदींवर तोफ डागली.
डावी आघाडी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तिवसा धामणगावरेल्वे मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी ते महाराष्ट्राच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. भाकपची निवडणुकीतील राजकीय भूमिका मांडण्यासाठी त्यांनी गांधी चौक, अंबागेट जवळील पक्ष कार्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. अंजान पुढे म्हणाले, की मोदी सरकार महागाई रोखू शकले नाहीत. देशातील महागाई प्रचंड वाढली आहे. गरजू वस्तूंचे भाव आवाक्याबाहेर आहेत. या सरकारची नीती ही शेतकरी विरोधी असल्याचाही आरोप त्यांनी केला. आधीच्या सरकारच्या भ्रष्टाचाराला कंटाळून लोकांनी मोदी सरकार निवडले. मात्र तेही लूटत आहेत. मोदी काल जरी गरीब असले, तरी आज ते श्रीमंतांच्या सोबतीला आहेत. काँग्रेस आणि भाजप या दोनही पक्षांची आर्थिक नीती सारखीच असल्याचेही ते म्हणाले. या अाधीच्या केंद्रातील सरकारने शेतक-यांना प्रचंड लुटले. विदर्भासह देशभरात शेतकरी आत्महत्या हा मोठा प्रश्न बनला. यंदा भाकप, माकप, शेकाप, जनता दल, लाल निशाण पार्टी इतर संघटांनासह 182 जागा महाराष्ट्र राज्यात लढवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला तुकाराम भस्मे, पी. बी. उके, तिवसाचे उमेदवार शरद मंगळे, धामणगांवचे उमेदवार शरद सुरजुसे, सुभाष पांडे, सुनील घटाळे, उषा घटाळे, बी. के. जाधव, पी. वाय. आकोटकर, जे. एम. कोठारी आदींची उपस्थिती होती.