आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याच्या कातडीसह दोन तस्करांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोंदिया - गोंदिया जिल्हय़ातील आमगाव तालुक्यातील बनगाव येथे बिबट्याच्या कातडीसह दोघा तस्करांना अटक करण्यात आली. प्रितेश अरविंदकुमार गुप्ता (वय 23) व कैलास मारूती फुंडे (वय 33) अशी आरोपींची नावे आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी अजय देवरे यांना दोघे जण बिबट्याची कातडी घेऊन जाणार असल्याची माहिती खबर्‍याने दिली होती. देवरे यांनी बनगाव पोल्ट्रीफार्मजवळ दोघांनाही अटक केली. या कातड्याची किंमत दहा लाख रूपये असल्याचे समजते. आंतरराज्यीय वनतस्कर व बहेलीया टोळीशी त्यांचा संबंध असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.