आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ ऑटोरिक्षाचालकाची शेजार्‍यानेच केली हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत रिंगरोडच्या पुलाखाली मृतावस्थेत शेख राजिक (30) या ऑटोरिक्षाचालकाचा शेजार्‍यानेच खून केल्याचे स्पष्ट झाले. गुन्हे शाखा पोलिसांनी रविवारी नसीर खान हबीब खान (27) याला अटक केली. ते गुलिस्तानगर येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी शनिवारी (दि. 7) शवविच्छेदनानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर काही तासांतच मारेकर्‍याला अटक करण्यात आली. नसीर हादेखील ऑटोरिक्षाच चालवतो. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शेख राजिक बुधवारी (दि. 4) सायंकाळी नमाजसाठी जास असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. नसीरने राजीक याला फोन करून अकबरनगरजवळ बोलावले होते. शेगाव नाक्यावरील वाइन शॉपमधून मद्य घेतल्यानंतर ते रिंगरोडवर आले. नसीरने राजिकला दारू पाजली व स्वत: बीअर प्यायली. राजिकला नशा चढल्यानंतर त्याने पुलाखाली ओढत नेऊन त्याच्यावर दगडाने प्राणघातक हल्ला चढवला व त्याला संपवले. राजीक याची नजर योग्य नसल्याने त्याला संपवल्याचे नसीरने पोलिसांना सांगितले. मात्र, मूळ कारण अद्यापही समोर आले नसून, तपासाअंती ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अन्य एकाचा समावेश असल्याचे पुढे आले. मात्र, त्याला अद्याप अटक झाली नसल्याचे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रवि राठोड यांनी सांगितले. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवि राठोड, शे. नबी, निळकंठ चव्हाण, संग्राम भोजने, किशोर महाजन, संतोष यादव, शे. जहीर पार पाडली.