आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Amravati Police, Divya Marathi

आरोपीचा कोठडीत मृत्यू,अमरावतीच्या कोतवाली पोलिस ठाण्यातील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - कोतवाली पोलिसांच्या कोठडीत असलेल्या 45 वर्षीय आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. दत्तूजी नारायण जाधव असे या मृतकाचे नाव असून, स्थानिक खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माताखिडकी परिसरातील तो रहिवासी आहे.


दत्तू जाधव व त्याचा मुलगा विनोद या दोघांना नितीन मनाजी वानखडे या व्यक्तीस क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. याबाबत नितीन याच्या तक्रारीवरून दोघांवरही भादंविच्या 324, 323, 34 अनुसार गुन्हे दाखल करून कोतवाली पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र, मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास दत्तूची प्रकृती बिघडल्याने त्याला अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी उपचार सुरू असतानाच दत्तू जाधव याचा मृत्यू आरोपीचा कोठडीत मृत्यू

झाला, असे पोलिस उपायुक्त बी. के. गावराणे यांनी सांगितले. दत्तू याच्या मृत्यूप्रकरणी सीआयडी चौकशी करण्यात येणार आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायंकाळी यवतमाळ येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला होता.


या पूर्वीही घडल्या ‘अशा’ तीन घटना : पोलिस कोठडीत आरोपीचा मृत्यू होण्याच्या तीन घटना जिल्ह्यात यापूर्वीही उघडकीस आल्या आहेत. काही वर्षांपूर्वी धामणगाव रेल्वे येथे भंगार खरेदी करणार्‍या व्यक्तीला रेल्वे पोलिस दलातील जवानांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता, तर वलगाव पोलिस ठाण्यामध्ये पोलिस कोठडीत असतानाच एका आरोपीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्रकरण घडले होते. पुढे हे आत्महत्या प्रकरण विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनातही गाजले होते. त्यानंतर संबंधित पोलिस अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात आली होती, तर अलीकडेच गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मनीष पेठे यांचाही मृत्यू झाला होता.