आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Daughter In Law, Police, Session Court, Divya Marathi

सुनेला जाळल्याप्रकरणी सासूला जन्मठेपेची शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - चोरीचा आळ घेऊन सुनेला जाळल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात सासूला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दुसर्‍या आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
सिंभोरा येथील 18 ऑक्टोबर 2012 रोजी प्रणिता मोरेश्वर सोनारे या महिलेला जळालेल्या अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेत तिचा मृत्यू झाला. तिने दिलेल्या मृत्युपूर्व बयाणानुसार, सासू निर्मला सोनारे यांनी घासलेट टाकून जाळले आणि नणंदेचे पती संजय शहाणे यांनी शिवीगाळ केली होती. यावरून सहायक पोलिस उपनिरीक्षक सुभाष इंगळे यांनी भादंविच्या कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करून पाच जुलै 2013 ला न्यायालयात दोषरोपपत्र सादर केले.

न्यायदानाच्या प्रक्रियेत एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी दोन जण फितुर झाले, अशी माहिती सहायक सरकारी वकील परीक्षित गणोरकर यांनी दिली. या प्रकरणी न्यायालयाने सासू निर्मला सोनारे हिला दोषी ठरवून जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. संजय शहाणे यांच्याविरुद्ध सबळ पुरावे न मिळाल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अँड. परीक्षित गणोरकर यांनी बाजू मांडली. या घटनेने निंभोरावासीय सुन्न झाले असून, दिवसभर याच घटनेची चर्चा सर्वत्र होती.