आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Divya Marathi, Amravati, Police

विद्यार्थिनीची पर्स चोरणार्‍या प्राध्यापकास अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुड - विद्यार्थिनीने परीक्षा केंद्राबाहेर ठेवलेली पर्स चोरून त्यातील एटीएम कार्डद्वारे 18 हजार रुपये काढले. पैसे काढल्याचा मॅसेज संबंधितांना मोबाइलवर प्राप्त होताच त्यात नमूद एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याची पोलिसांनी तपासणी करून चोरट्यास गजाआड केले. प्रा. श्रीधर दयाराम सोमकुंवर (53, रा. सोमकुंवर पॅलेस, मुलताई रोड, वरुड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो यवतमाळच्या अमोलकचंद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.


येथील महात्मा फुले महाविद्यालयात तालुक्यातील एकलविहीर येथील आम्रपाली रूपरावजी ढोके (20) ही विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी आली होती. परीक्षेदरम्यान सोबत असलेली पर्स तिने बाहेर काढून ठेवली. या पर्समध्ये मोबाइल आणि एटीएम कार्ड ठेवले होते. कुणीतरी ती पर्स चोरून नेल्याचे परीक्षा संपल्यावर लक्षात आले. परंतु, काही वेळेतच आम्रपालीच्या मावशीच्या मोबाइलवर एटीएममधून पैसे काढल्याचा ‘मॅसेज’ प्राप्त झाला. त्यामुळे वरुड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. वरुड पोलिसांनी एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये शोध घेतला असता, उपरोक्त आरोपीची ओळख पटली. त्यानंतर यवतमाळ येथून वरुड पोलिसांनी आरोपीला अटक केली.