आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Local Crime Branch, Divya Marathi, Amravati

भक्त म्हणून आले चोरी करून गेले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - घुईखेड येथील बेंडोजी महाराज देवस्थानमध्ये चोरी करून दोन लाख 28 हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना 25 जानेवारीला घडली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी एका महिलेसह दोन पुरुषांना अटक केली. विश्वास नत्थूजी सरकटे (51 रा. बोरगाव मंजू), मीनाक्षी योगिराज इंगळे (रा. बोरगाव मंजू) आणि सुधीर साहेबराव इंगळे (34 रा. शिवणी जि. अकोला) या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांनी घुईखेड येथील बेंडोजी महाराजांच्या मूर्तीवरील मुकुटही लंपास करण्यात आला होता. याच त्रिकुटाने लोणी टाकळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिंगलासपूर येथील दीड लाखांचा ऐवज लंपास केल्याचे तपासात उघड झाले. ज्वालामुखी देवी मंदिरात 25 मार्च 2013 रोजी ही चोरी झाली होती.


अभिषेक करायचा असल्याचे सांगून तीन ते चार दिवस मुक्कामी राहायचे, मंदिरातील सर्व माहिती घ्यायची आणि वेळ साधून पोबारा करायचा, अशी त्यांची पद्धत आहे. बेंडोजी महाराजांच्या मंदिरात चोरी करण्यापूर्वी त्यांनी तीन ते चार दिवस मुक्काम केला होता. विलास साबळे, दर्यापूर अशा बनावट नावाने सुधीर इंगळे याने वास्तव्य केले होते. देवाच्या आशीर्वादाने अपत्यप्राप्ती झाली आहे, असा बनाव त्याने केला होता. तपासादरम्यान या संशयितांचे रेखाचित्र काढले होते. त्याच्याशी जुळणार्‍या व्यक्ती अकोला कारागृहात होत्या. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ही चोरी त्यांनीच केल्याचे उघड झाले. ही कारवाई सहायक अधीक्षक मंजुनाथ सिंगे, उपविभागीय पोलिस अधिकारी ए. जी. खान, किरण वानखडे, एच. बी. पठाण, अरुण मेटे, मूलचंद भांबूरकर, श्रीकृष्ण हनवते, त्र्यंबक मनोहरे, शकील चव्हाण यांनी केली.


चोरीतील ऐवज जप्त होणार
बेंडोजी महाराजांच्या मंदिरात या तिघांनीच चोरी केली. अजूनही काही मंदिरांमध्ये झालेल्या चोरीची कबुली ते देत आहेत. बेंडोजी महारांजाचा मुकुट व अन्य साहित्य लवकरच जप्त करण्यात येणार आहे. किरण वानखडे, सहायक पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा.